एक्स्प्लोर
Advertisement
महिला सुरक्षा सर्व्हे : 70% महिलांना वाटते बालात्काऱ्यांना फाशी व्हावी, 83% महिलांच्या मते गुन्ह्यांमध्ये वाढ झाली
एबीपी न्यूजने महिलांच्या सुरक्षेबाबत महिला आणि पुरषांना काही प्रश्न विचारले. या सर्वेक्षणाचा एक अहवाल सादर केला आहे. या सर्वेक्षणानुसार 18% लोकांना असे वाटते की महिलांवरील अत्याचारांना पुरषांची मानसिकता जबाबदार आहे. तर 14% लोकांना वाटते की इंटरनेट आणि टिव्हीवर दाखवला जाणारा अश्लील कंटेट याला जबाबदार आहे.
नवी दिल्ली : हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. महिला सुरक्षेबाबत, महिलांवरील अत्याचारांबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, कडक कायदे केले जावेत अशा प्रकारच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. याचदरम्यान एबीपी न्यूजने महिलांच्या सुरक्षेबाबत महिला आणि पुरषांना काही प्रश्न विचारले. या सर्वेक्षणाचा एक अहवाल सादर केला आहे.
या सर्वेक्षणानुसार 18% लोकांना असे वाटते की महिलांवरील अत्याचारांना पुरषांची मानसिकता जबाबदार आहे. 14% लोकांना वाटते की इंटरनेट आणि टिव्हीवर दाखवला जाणारा अश्लील कंटेट याला जबाबदार आहे. 14% लोकांनी या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर 21% टक्के लोक असे म्हणाले की, नराधमांमध्ये कायद्याची भीती उरलेली नाही.
1. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे?
होय - 83 टक्के
नाही - 10 टक्के
मागील वर्षाप्रमाणे - 7 टक्के
सांगता येत नाही - 1 टक्के
2. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमागील कारणे कोणती?
कायद्याची भीती नाही - 21 टक्के
कमकुवत कायदे - 19 टक्के
न्याय मिळण्यास विलंब - 4 टक्के
कमकुवत पोलीस प्रशासन - 9 टक्के
पुरुषी मानसिकता - 8 टक्के
महिलांचे कपडे - 9 टक्के
अन्य - 30%
3. महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे घडण्यास कोण जबाबदार आहे?
पुरुषांची मानसिकता - 18 टक्के
इंटरनेट/टिव्ही - 14 टक्के
पोलीस - 13 टक्के
केंद्र सरकार - 12 टक्के
राज्य सरकार - 14 टक्के
महिला - 6 टक्के
अन्य - 23 टक्के
4. बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा व्हायला हवी?
मृत्यूदंड - 70 टक्के
आजीवन कारावास - 9 टक्के
अन्य - 21 टक्के
5. पीडित महिला पोलिसांत तक्रार का करत नाहीत?
बदनामीची भीती - 48 टक्के
पोलिसांवर विश्वास नसणे - 7 टक्के
कुटुंबाची साथ नसणे - 5 टक्के
पीडितेलाच जबाबदार ठरवणे - 5 टक्के
अन्य - 35 टक्के
6. निर्भयावर बलात्कार करणाऱ्यांना फाशी न होण्यास कोण जबाबदार आहे?
कायदा - 56 टक्के
केंद्र सरकार - 19 टक्के
राज्य सरकार - 13 टक्के
अन्य - 12 टक्के
7. विनयभंग झाल्यानंतर पीडित महिला/तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार करतात?
होय - 5 टक्के
नाही - 34 टक्के
सांगता येत नाही - 61 टक्के
8. महिला बाहेर जाण्यापूर्वी घरातील इतर सदस्यांना सांगतात का?
होय - 81 टक्के
नाही - 10 टक्के
सांगता येत नाही - 9 टक्के
9. महिला एकट्याने प्रवास करण्यास घाबरतात का?
होय - 40 टक्के
नाही - 53 टक्के
सांगता येत नाही - 7 टक्के
10. बलात्कार/हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरदेखील प्रौढांप्रमाणे गुन्हा दाखल करायला हवा का?
होय - 88 टक्के
नाही - 5 टक्के
सांगता येत नाही - 7 टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
बीड
भारत
Advertisement