ABP C Voter Survey : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, निवडणुकीवर स्थगिती किंवा रॅलींवर निर्बंध, काय आहे लोकांचे मत?
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुका नव्या वर्षात होत आहेत. या निवडणुकांसाठी रॅलींचे आयोजन केले जात आहे. या रॅलींना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
![ABP C Voter Survey : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, निवडणुकीवर स्थगिती किंवा रॅलींवर निर्बंध, काय आहे लोकांचे मत? abp c voter election survey on assembly election 2022 and polls rally omicron variant scare ABP C Voter Survey : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, निवडणुकीवर स्थगिती किंवा रॅलींवर निर्बंध, काय आहे लोकांचे मत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/1fe03349a1b09469fee3a5499823ff47_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP C Voter Survey : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022) जवळ येत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचे (Corona) संटक पुन्हा गडद होत आहे. कोरोना रूग्णांसह ओमायक्रॉनच्या ( omicron) रूग्णांची संख्या वाढत आहे. परंतु निवडणुकांच्या रॅलींमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 578 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुका नव्या वर्षात होत आहेत. या निवडणुकांसाठी रॅलींचे आयोजन केले जात आहे. या रॅलींना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी वोटरने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये रॅली आणि निवडणुकांवर स्थगितीवरून प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये 52 टक्के लोकांनी रॅलींवर बंदी घातली पाहिजे असे मत व्यक्त केले. तर 24 टक्के लोकांचे मत आहे की, निवडणुकांनाच स्थगिती देण्यात यावी. तर 24 टक्के लोक म्हणतात रॅली आणि निवडणूक दोन्हींवर बंदी घातली पाहिजे.
निवडणूक आयोगाची बैठक
कोरोनाचा धोका ओळखून आज निवडणूक आयोगाने बैठक घेतली. यामध्ये आरोग्य सचिवांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर एक अहवाल सादर केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी आरोग्य सचिवांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली नवी नियमावली आणि गृहमंत्रालयाने जारी केल्या निर्देशांचीही माहिती दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने आयटीबीपी, बीएसएफ आणि एसएसबीच्या वरिष्ठ अधिकांऱ्यांसोबत चर्चा करून आंतरराष्ट्रीय सीमांवर कडक देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Omicron : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, अलाहाबाद हायकोर्ट
- Omicron : देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा धोका, निवडणूक आयोगाने आरोग्य सचिवांकडून मागवला अहवाल
- Uttar Pradesh विधानसभेसाठी Congress चा 'लडकी हूँ लड सकत हूँ' चा नारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)