एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं
नवी दिल्ली : बनावट वाहन परवाना तयार करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार वाहन परवान्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्याची शक्यता आहे. नवीन वाहन परवाना काढण्यासाठी किंवा जुन्या वाहन परवान्याचं नुतनीकरण करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं होणार आहे.
वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास किंवा वाहन परवाना हरवल्यास त्याच नावाने पुन्हा वाहन परवाना तयार केला जातो. असे प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलणार आहे. ऑक्टोबर 2017 पासून हा नवा नियम लागू होऊ शकतो.
नवीन वाहन परवाना काढण्यासाठी केवळ आधार कार्ड हे एकमेव कागदपत्र सादर करावं लागेल. आधार कार्ड नसल्यास अनेक प्रकारच्या कागदत्रांची जुळवाजुळव करावी लागू शकते.
आधार कार्ड कसं मिळवाल?
तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा नोंदणी करुन अजून मिळालं नसेल तर 1947 या क्रमांकावर फोन करुन त्याची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड नोंदणी करताना दिलेला एनरोलमेंट आयडी क्रमांक असणं गरजेचं आहे. याच क्रमांकावर फोन करुन तुम्ही तुमच्या जवळचं आधार नोंदणी केंद्रही माहित करुन घेऊ शकता.
यूआयडीच्या वेबसाईटला एनरोलमेंट आयडीसह भेट देणं हा हरवलेलं आधार कार्ड मिळवण्याचा सोपा पर्याय आहे. वेबसाईटवर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करु शकता, हरवलेल्या कार्डची प्रिंट मिळवू शकता किंवा नावामध्ये काही बदल असतील ते देखील करु शकता.
... तर कुणालाही सेवेपासून वंचित ठेवू नये : केंद्र सरकार
आधार कार्ड नसेल, तर कुणालाही सरकारी सुविधेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच दिले आहेत.
आधार कार्ड नसेल तर त्याऐवजी ओळखपत्र म्हणून इतर कागदपत्र ग्राह्य धरली जातील. मात्र संबंधित व्यक्ती जोपर्यंत आधार कार्ड काढत नाही, तोपर्यंतच त्याची इतर कागदपत्र ग्राह्य धरली जातील, असंही सरकारने नमूद केलं.
केंद्र सरकारने नुकतंच 30 पेक्षा अधिक सरकारी सुविधांसाठी आधार अनिवार्य केलं आहे. जवळपास 84 प्रकारच्या सरकारी सुविधांसाठी सध्या आधार अनिवार्य आहे. मात्र आधार नसलेल्यांची चिंता वाढली होती. त्यामुळे जोपर्यंत आधार काढलं जात नाही, तोपर्यंत सरकारने इतर कागदपत्र वापरण्याची सवलत दिली आहे.
अंगणवाडीसारख्या बालविकास योजनांसाठी आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र शाळा आणि अंगणवाडींनाही केंद्र सरकारने ज्या मुलांकडे आधार नसेल, त्यांची आधारसाठी नोंदणी करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड सक्तीचं
रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतींसाठी आधार कार्ड सक्तीचं?
विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आधार क्रमांक आधारित ओळखपत्र अनिवार्य
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक
आधार पेमेंट अॅप : अंगठा दाखवा; पेमेंट करा
परीक्षेला बसताय, आधी आधार कार्ड दाखवा!
आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप
‘या’ 15 कामांसाठी यापुढे आधार कार्ड अनिवार्य!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement