एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता बँक खातं उघडण्यासाठी आधार अनिवार्य
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयाअंतर्गत बँकेत खातं उघडण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक आहे.
50 हजारांच्या व्यवहारासाठी आधार गरजेचं
याशिवाय 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांमधील व्यवहारासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळे काळ्या पैशांवर आळा बसेल असं म्हटलं जात आहे.
सर्व बँक खातेधारकांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार क्रमांक बँकेत जोडण्यास सांगितलं आहे, असं न केल्यास त्यांची बँक खाती अवैध होतील.
नवं खातं उघडायचं असल्यास नियम काय?
जर कोणाला नवं बँक खातं उघडायचं असेल आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल, तर त्यांना आधार एनरोलमेंट प्रूफ द्यावा लागेल. खातं उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना आधार क्रमांक द्यावं लागेल.
मोठ्या खरेदीवर सरकारची नजर
बँक खातं आधारला जोडल्यास आता सरकार लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा होणारे पैसे आणि त्यांच्या खरेदीवर लक्ष ठेवू शकतं. उदाहरणार्थ, आता घर खरेदीसाठीही आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने घर खरेदी केल्यास त्यावर सरकारची नजर राहिल.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय
याआधी आयकर रिटर्न आणि नव्या पॅन कार्डसाठीही आधार कार्ड गरजेचं असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं होतं. परंतु आधार कार्डबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने संविधान पीठाच्या अंतिम निर्णयापर्यंत आयकर रिटर्नसाठी आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement