King Cobra Video: तब्बल 18 फुटांचा किंग कोब्रा पाहून वनखात्याची खाकी वर्दीतील रणरागिनी डगमगली नाही; अवघ्या सहा मिनिटात पकडून बंदिस्त केला!
या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला अधिकाऱ्याने काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले

forest officer in Kerala Kozhikode rescuing a king cobra: केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात अत्यंत धाडसी महिला वन अधिकाऱ्याने किंग कोब्राला फक्त ६ मिनिटांत रेस्क्यू करत सर्वांनाच चकित केलं. महिला अधिकाऱ्याचं धाडस पाहून सर्वानीच सलाम ठोकला आहे. हे काम केवळ धोकादायक नव्हते तर त्यासाठी संयम, आत्मविश्वास आणि अनुभवाचीही आवश्यकता होती.
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी
या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला अधिकाऱ्याने काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की महिला अधिकाऱ्याने प्रथम संपूर्ण परिसराची काळजीपूर्वक तपासणी केली, नंतर विशेष उपकरणांच्या मदतीने हळूहळू किंग कोब्राला नियंत्रित केले आणि कोणतीही घाई न करता सुरक्षित ठिकाणी सोडले. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नाही. हा साप खूप चपळ आणि धोकादायक आहे. तरीही, या महिला अधिकाऱ्याने हे बचाव अतिशय शांतपणे आणि निर्भयपणे पूर्ण केले.
केरल की महिला फॉरेस्ट ऑफिसर ने 6 मिनट में किया अपने पहले किंग कोबरा का रेस्क्यू. सोशल मीडिया पर छाईं. देखिए वायरल वीडियो pic.twitter.com/QKWhOzKZsi
— Abhishek Kumar (ABP News) (@pixelsabhi) July 7, 2025
नेटकऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला मजेदार नावे दिली
सोशल मीडियावर लोकांनी या प्रयत्नाचे कौतुक केले. अनेक वापरकर्त्यांनी तिला "रिअल हिरो", "फिअरलेस फॉरेस्ट गार्ड" आणि "नेचरचा प्रोटेक्टर" अशी नावे दिली. या घटनेवरून हेही सिद्ध होते की वन्यजीव संवर्धनासारख्या कठीण क्षेत्रातही महिला आता प्रभावी भूमिका बजावत आहेत. वन विभागानेही या महिला अधिकाऱ्याच्या शौर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. ही घटना वन सेवेतील महिलांच्या सहभागाचे आणि नेतृत्व क्षमतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे विभागाने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























