एक्स्प्लोर

Pulwama terror attack : 'त्या' मॅसेजने जवानाचा जीव वाचवला

अहमदनगर जिल्ह्यातील ठका बेलकर हा तरुण सीआरपीएफच्या 76 व्या बटालियनमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये तैनात होता. 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला, त्या बसमधून तो काश्मीरकडे प्रवास करण्यासाठी तो निघाला होता.

अहमदनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. मात्र एका मेसेजमुळे अहमदनगरमधील सीआरपीएफ जवानाचा जीव वाचला. ठका बेलकर (वय 28 वर्ष) असं या जवानाचं नाव असून तो मूळचा पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत म्हसोबाझाप (गाजरेझाप) गावातला आहे. हा तरुण सीआरपीएफच्या 76 व्या बटालियनमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये तैनात होता. 14 फेब्रुवारीला ठकाच्या बटालियनला कश्मीर खोऱ्याकडे कूच करण्याच्या सूचना मिळाल्या. एचआर 49 एफ 0637 या बसमध्ये होता. या महिन्यातच ठकाचे गावी लग्न आहे. लग्नासाठी सुट्टीचा अर्जही त्याने केला होता. सुट्टी मंजूर झाली नाही तर ड्युटीवर जावे लागेल, अशा सूचना त्याला मिळाल्या होत्या. त्यामुळे ठकाने काश्मीरकडे निघण्याची तयारी केली. लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या, परंतु रजा मंजूर झाली नव्हती. कर्तव्याच्या भावनेने ठका काश्मीर खोऱ्याकडे बसमधून जाण्यास निघाला. ठका दुपारी बसमध्ये जाऊन बसला. परंतु बस रवाना होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच शेवटच्या क्षणाला रजा मंजूर केल्याचा मेसेज ठकाला मिळाला. ठकाच्या आनंदाला पारावर उरला नाही. रजा मंजूर झाल्याची माहिती बसमधल्या सीआरएपीएफच्या सहकाऱ्यांना देताच सहकाऱ्यांनी ठकावर अभिनंदनाचा वर्षाव केला. सहकाऱ्यांना कडक सल्यूट करीत ठकाने बसमधल्या जवानांचा निरोप घेतला. बसमधून उतरुन त्याने गावी जाण्याची तयारी सुरु केली. पण दुपारी सव्वातीनच्या सुमारास पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बसवर आत्मघातकी हल्ला झाल्याची बातमी आली. ठका ज्या बसमधून प्रवास करणार होता, त्याच बसवर हल्ला झाला होता. काही तासांपूर्वीच ज्या सहकारी जवानांनी हसतखेळत ठकाला निरोप दिला होता. त्या जवानांचा तो शेवटचा प्रवास ठरला होता. लग्नाची सुट्टी मिळाल्याचा ठकाचा आनंद काही क्षणातच मावळला. हल्ल्याची बातमी समजताच गावी ठकाच्या आई वडिलांनी त्याच्याशी तात्काळ संपर्क करुन त्याची विचारपूस केली आणि आपला मुलगा सुखरुप आहे असे समजल्यावर त्यांना आनंद तर झालाच, मात्र जे जवान या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संबंधित बातम्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : पुलवामा हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध, दहशतवादाविरोधात भारतासोबत Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय? Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय Pulwama terror attack : शहीद जवानांच्या पार्थिवांना गृहमंत्र्यांनी खांदा दिला, पार्थिवं पाहून अवघा देश हळहळला Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्... Pulwama terror attack : हा भारताच्या आत्म्यावरचा हल्ला : राहुल गांधी Kashmir Terror Attack : जम्मूमधल्या नौशेरामध्ये आयईडीचा स्फोट, मेजर शहीद 'त्या' शहीद मेजरचे पुढच्या महिन्यात लग्न होते, लग्नपत्रिका व्हायरल Pulwama Terror attack : हल्लेखोरांबाबत 'जैश..'चा म्होरक्या मसूद अजहर म्हणतो... जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, मेजरसह चार जवान शहीद
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget