एक्स्प्लोर
Advertisement
नरेंद्र मोदी अॅप सर्व्हे : 93 टक्के भारतीयांचा नोटाबंदीला पाठिंबा
नवी दिल्ली : काळ्या पैशावर नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना 93 टक्के भारतीयांनी साथ दिली आहे. मोदींनी लोकांचा कौल जाणून घेण्यासाठी खास जनमत चाचणी घेतली होती. ज्यात जवळपास 5 लाख लोकांनी सहभाग नोंदवला.
मोदींनी 'नरेंद्र मोदी अॅप'द्वारे मत नोंदवण्याचं आवाहन केलं होतं. सहभाग नोंदवलेल्या 70 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी मोदींच्या निर्णयाला फाईव्ह स्टार दिले आहेत. तर एकूण 93 टक्के नागरिक मोदींच्या बाजूने उभे आहेत. तर फक्त 2 टक्के लोकांनीच मोदींच्या निर्णयाचा विरोध करणारं मत नोंदवलं आहे.
8 तारखेला 14 लाख कोटींच्या 86 टक्के हजार-पाचशेच्या नोटा मोदींनी चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर 15 दिवसात देशभरातील बँकांमध्ये 5 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाली. मात्र या निर्णयावर टीका होऊ लागल्यानंतर मोदींनी जनमत चाचणी घेतली.
सी-व्होटरच्या सर्व्हेत 80 टक्के नागरिकांचा पाठिंबा
दरम्यान यापूर्वीही सी-व्होटरच्या सर्वेक्षणात 80 टक्के भारतीयांनी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. देशातील 80 टक्के जनता मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या बाजूने आहेत, असा निष्कर्ष सी व्होटरने काढला आहे. देशभरात केलेल्या सर्व्हेनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.
असं असलं, तरी नोटबंदीचा निर्णय चांगला आहे मात्र त्यानंतरचं मॅनेजमेंट वाईट होतं, असं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.
विविध उत्पन्न गटातील नागरिक, गाव असो की शहर, नोटबंदीला बहुतेकांनी समर्थन दिलं आहे. मात्र त्यानंतरच्या असुविधेमुळे अनेकांनी नाराजी वर्तवली आहे. सी व्होटरने 21 नोव्हेंबरला देशभरातील जवळपास निम्म्या म्हणजे 252 लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे केला.
संबंधित बातमी : नोटाबंदी: 80 % जनतेचा मोदींना पाठिंबा : सर्व्हे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement