एक्स्प्लोर

Oxygen Plants | पीएम केअर्स फंडमार्फत सरकारी रुग्णालयांत 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार

जिल्हा पातळीवर ऑक्सिजनच्या उपलब्धतेस मोठी चालना मिळेल. 551 ऑक्सिजन प्लांटसाठी पीएम केअर फंडमधून निधी देण्यात येणार आहे.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत यांची खरेदी करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : देशातील बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पीएम केअर फंडमधून शासकीय रुग्णालयात 550 हून अधिक ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स उभारले जाणार आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 551 नवीन वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या स्थापनेस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयानुसार हे ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर सुरू करावे, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे. या प्रकल्पांद्वारे जिल्हा पातळीवर ऑक्सिजनच्या उपलब्धतेस मोठी चालना मिळेल. 551 ऑक्सिजन प्लांटसाठी पीएम केअर फंडमधून निधी देण्यात येणार आहे.

रुग्णालयांतील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पीएम केअर्स निधीतून देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये  551 समर्पित प्रेशर स्विंग अ‍ॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प  लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.  विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालयातील विशिष्ट सरकारी रुग्णालयांत हे प्रकल्प स्थापन केले जातील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत यांची खरेदी करण्यात येणार आहे.

पी एम केअर्स  निधीतून  या वर्षाच्या प्रारंभी  देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये अतिरिक्त 162 प्रेशर स्विंग अ‍ॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 201.58 कोटी रूपयांच्या निधीचे  वाटप करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित करण्यामागील मूळ उद्दीष्ट सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे अधिक सबलीकरण  करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती  सुविधा असणे, याबद्दल सुनिश्चित करणे हे आहे.

अशाप्रकारचे स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प  जिल्ह्यातील मुख्यालयातील रुग्णालयाच्या तसेच जिल्ह्याच्या  दैनंदिन  वैद्यकीय प्राणवायूच्या गरजा पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) हा ऑक्सिजनची अतिरीक्त आवश्यकता पूर्ण करणारी यंत्रणा म्हणून काम करेल. जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठा अचानक खंडित होऊ नये आणि कोविड-19  रूग्ण किंवा इतर रुग्णांना अशा प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास त्यांना हव्या तेवढ्या प्रमाणात  नियमितपणे ऑक्सिजन पुरवठा करणे यामुळे सुनिश्चित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget