एक्स्प्लोर
भूकंपाचा सर्वाधिक धोका असलेली देशातील 29 शहरं
बहुतांश शहरं हिमालयातील आहेत, जे भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय क्षेत्रात आहेत, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) दिली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली आणि अन्य 9 राज्यांच्या राजधानीसह देशातील 29 शहरं भूकंपाच्या तीव्र ते अति तीव्र धोक्याच्या क्षेत्रात येतात. यापैकी बहुतांश शहरं हिमालयातील आहेत, जे भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय क्षेत्रात आहेत, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) दिली आहे.
दिल्ली, पाटणा (बिहार), श्रीनगर (जम्मू-कश्मीर), कोहिमा (नागालँड), पुडुच्चेरी, गुवाहटी (आसाम), गंगटोक (सिक्किम), शिमला (हिमाचल प्रदेश), देहरादून (उत्तराखंड), इंफाळ (मणिपूर) आणि चंदीगड ही शहरं भूकंपाच्या 4 आणि 5 क्षेत्रात येतात.
भारतीय मानक ब्यूरो म्हणजे बीआयएसने भूकंपाची नोंद, हालचाली आणि भूकंपापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी भूकंपाचं वर्गीकरण क्षेत्र 2 ते 5 यादरम्यान केलं आहे, अशी माहिती एनसीएसचे संचालक विनीत गहलोत यांनी दिली.
श्रेणी 2 हे भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक कमी सक्रिय, तर 5 हे सर्वाधिक सक्रिय असणारं क्षेत्र आहे. 4 आणि 5 हे अनुक्रमे तीव्र ते अति तीव्र या क्षेत्रामध्ये येतात.
संपूर्ण इशान्य भाग, जम्मू काश्मीरमधील काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचं रण, उत्तर बिहार आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह हे क्षेत्र 5 या श्रेणीमध्ये येतात.
जम्मू काश्मीरमधील काही भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तरी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्राचा छोटासा भाग भूकंपाच्या 4 या श्रेणीमध्ये येतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement