एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा अध्यक्षांची कठोर कारवाई, 26 खासदारांचं निलंबन
कावेरी पाणी वाटपावरुन एआयएडीएमकेचे खासदार गोंधळ करत होते.
नवी दिल्ली : लोकसभेत मोकळ्या जागेत गोंधळ घालणाऱ्या 26 खासदारांवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी कठोर कारवाई केली. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण केल्याप्रकरणी सुमित्रा महाजन यांनी एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे.
कावेरी पाणी वाटपावरुन एआयएडीएमकेचे खासदार गोंधळ करत होते. लोकसभेत बुधवारी राफेल विमान कराराच्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. यादरम्यान अन्नाद्रमुक पक्षाचा एक खासदार सभागृहाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खुर्चीवर उभं राहून घोषणाबाजी करत होता. तर पक्षाचे इतर सदस्य कागदाची फाडून फेकत होते. यानंतर सभागृहाचं कामकाज सुमारे 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. पाच वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी वारंवार खासदरांना शांततेचं आवाहन केलं आणि कारवाईचा इशाराही दिला. मात्र त्यांचा गोंधळ सुरुच असल्याने 174 (अ) या नियमाअंतर्गत 26 खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
आता निवडणुका जवळ येत आहेत. भाजपाला कर्नाटकात काही जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी मेकेदातू धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. विरोध करणं हा आमचा लोकशाही अधिकार आहे, सरकारकडून आमच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत, असं एआयएडीएमकेचे खासदार एम. थंबीदुराई म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement