एक्स्प्लोर

मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले, महाराष्ट्रातून दोघांचे नाव; राहुल गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदाच देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींसमवेत तब्बल 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून महाराष्ट्रातून 6 जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं मिळालं तर देशात इंडिया आघाडीलाही चांगलच यश लाभलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) नेतृत्वातील एनडीए आघाडीने 293 जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला 234 जागांवर यश प्राप्त झाले. त्यामुळे, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्तावित आहे. त्यातच, निवडणूक प्रचारात घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. तर, नरेंद्र मोदींकडून शहजादे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं गेलं. मात्र, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नेते घराणेशाहीतून आलेले आहेत. स्वत: राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली, तसेच परिवार मंडल असे म्हणत राहुल गांधींनी भाजप व नरेंद्र मोदींवर टीका केलीय.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींसमवेत तब्बल 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून महाराष्ट्रातून 6 जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यात, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार आणि 3 राज्यमंत्रीपद मिळाली आहेत. त्यामध्ये, भाजप नेते नितीन गडकरी व पियुष गोयल हे पुन्हा एकदा मंत्री बनले असून रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. रक्षा खडसे दुसऱ्यांदा खासदार बनल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहेत. मात्र, रक्षा खडसेंना मिळालेली मंत्रीपदाची संधी ही घराणेशाही असल्याचं स्वत: राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर, मंत्री पियुष गोयल यांचे वडिल वेद प्रकाश गोयल हेही मंत्री राहिले आहेत.

काँग्रेस हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे, घराणेशाही जगवायचं काम काँग्रेसकडून होतं. लांगुलचालन आणि घराणेशाहीवरुन मोदींनी अनेकदा राहुल गांधींना लक्ष्य केलं. मात्र, आता भाजपमध्येच कशी घराणेशाही आहे हे राहुल गांधींनी म्हटलं आहे. मोदी सरकारमध्ये नव्याने शपथ घेतलेले तब्बल 20 मंत्री आहेत, ज्यांना राजकीय वारसा आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील रक्षा खडसे आणि पियुष गोयल यांचेही नाव आहे. 

एच.डी. कुमारस्वामी
ज्योतिरादित्य शिंदे
किरण रिजेजू
रक्षा खडसे
जयंत चौधरी
चिराग पासवान
जेपी नड्डा
कमलेश पासवान
रामनाथ ठाकूर, 
राममोहन नायडू
जितीन प्रसादा
शंतनू ठाकूर
राव इंद्रजीत सिंग
पियुष गोयल
किर्ती वर्धन सिंग
विरेंद्रकुमार खाटीक
रवणीनत सिंग बिट्टू
धर्मेंद्र प्रधान
अनुप्रिया पटेल
अन्नपूर्णा देवी

अशी 20 मंत्र्यांची नावे राहुल गांधींनी ट्विट केली आहेत. या सर्व मंत्र्यांचे वडिल किंवा कुटुंबातील सदस्य हे यापूर्वी मंत्री राहिले आहेत. 

काँग्रेसचं संख्याबळ 237

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्रातील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेल्या विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. तर, दोन अपक्ष खासदारांनी इंडिया आघाडीला बळ दिल्यानंतर लडाखचे खासदार मोहम्मद हनीफाही इंडिया आघाडीत सामील झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या हनीफा यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि इंडिया आघाडीत सामील झाले. त्यामुळे, काँग्रेसचं संख्याबळ 237 झालं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget