एक्स्प्लोर

2 January In History : आजच्या दिवशी सुरू झाला भारतरत्न पुरस्कार, आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

On This Day In History :  कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात देशाची असाधारण आणि उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' दिला जातो. 2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या सन्मानाची स्थापना केली होती.

On This Day In History : भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात देशाची असाधारण आणि उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (Bharat Ratna) दिला जातो. 2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Former President of India Rajendra Prasad) यांनी या सन्मानाची स्थापना केली होती. सुरुवातीला हा सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती, परंतु एका वर्षानंतर ही तरतूद जोडण्यात आली. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना भारतरत्न देण्याची तरतूदही नंतर समाविष्ट करण्यात आली.

1906: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्मदिन Dara Nusserwanji Khurody

दारा नुसेरवानजी खुरोडे ( Dara Nusserwanji Khurody) हे एक प्रसिद्ध भारतीय उद्योजक होते. जे भारताच्या दुग्ध उद्योगातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम केले. पुढे त्यांनी अनेक सरकारी उच्च पदांवरही काम केले. डी.एन. खुरोडे यांनी 1946 ते 1952 या काळात मुंबईचे दूध आयुक्त म्हणूनही काम पाहिले. 1963 मध्ये डी.एन. खुरोडे यांना वर्गीस कुरियन यांच्यासोबत संयुक्तपणे 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' प्रदान करण्यात आला. भारत सरकारने 1964 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' देऊन गौरविले.

1936: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना (Madhya Pradesh High Court)

मध्य प्रदेश उच्च न्यायालय हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याचे न्यायालय आहे. याची स्थापना 2 जानेवारी 1936 रोजी करण्यात आली.

1942 : दुसऱ्या महायुद्धात  जपानी सैन्याने फिलिपाइन्सची राजधानी मनिला ताब्यात घेतली. (Second World War)

दुसऱ्या महायुद्धादरम्यान 2 जानेवारी 1942 रोजी जपानी (japan) सैन्याने फिलीपिन्सवर आक्रमण करून तिची राजधानी मनिला ताब्यात घेतली. पूर्व आशिया आणि इंडोचीनमध्ये आपले वर्चस्व वाढवण्याच्या जपानच्या (japan) महत्त्वाकांक्षेमुळे फिलिपाइन्सवर आक्रमण केले होते.

1959:  किर्ती आझाद यांचा जन्मदिन (Kirti Azad)

माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांचा आज वाढदिवस आहे. 2 जानेवारी 1959 रोजी बिहारच्या पूर्णिया येथे जन्मलेले कीर्ती आझाद यांचे वडील भागवत झा बिहारचे मुख्यमंत्रीही होते. वडिलांकडूनच त्यांना राजकारणाचा वारसा लाभला. कीर्ती आझाद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य म्हणून 7 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. 

1978 : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी काँग्रेस (आय) नावाने एक नवीन पक्ष स्थापन केला आणि स्वतःला त्याचे अध्यक्ष म्हणून घोषित केले.

आजच्याच दिवशी  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आय) नावाने एक नवीन पक्ष स्थापन केला. आयचा अर्थ स्पष्टपणे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) असा आहे. आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या आणि निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला नाही, 1978 मध्ये पक्षांतर्गत फूट पडली. इंदिरा गांधींच्या समर्थकांनी त्यांच्या गटाला काँग्रेस (आय) असे नाव दिले. यापूर्वी इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) गटाला काँग्रेस (आर) असेही म्हटले जात होते.

2015: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांची पुण्यतिथी 

वसंत रणछोड गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. गोवारीकर हे 1991 ते 1993 या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर हे 1994 ते 2000 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget