एक्स्प्लोर
आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर रुग्णालयाकडून 18 लाखांचं बिल
फरीदाबादमधील एशियन रुग्णालयानं आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटंबीयांना तब्बल 18 लाखांचं बिल दिलं आहे.
फरीदाबाद (हरियाणा) : फरीदाबादमधील एशियन रुग्णालयानं आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटंबीयांना तब्बल 18 लाखांचं बिल दिलं आहे. या रुग्णालयात तापानं फणफणलेल्या एका गर्भवती महिलेवर गेले 22 दिवस उपचार सुरु होते. पण 22 दिवसांनंतर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.
22 दिवसांच्या उपचारानंतर एशियन हॉस्पिटलनं मृत महिलेच्या कुटुंबीयांना 18 लाखांचं बील सोपवलं. पण आता कुटुंबीयांनी या रुग्णालयाविरोधात चौकशीची मागणी केली आहे. फरीदाबादच्या नचौली गावात राहणाऱ्या सीताराम यांच्या 20 वर्षीय मुलीला 13 डिसेंबर रोजी एशियन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तीन-चार दिवसातच महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला असून तिच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यासाठी आधी साडेतीन लाख जमा करण्यास सांगण्यात आलं.
मृत श्वेताच्या वडिलांनी याप्रकरणी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. 'जोवर आम्ही पैसे जमा केले नाही तोपर्यंत डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली नाही. त्यामुळे श्वेताच्या पोटात इंफेक्शन झालं.' शस्त्रक्रियेनंतर श्वेताच्या गर्भात 7 महिन्याची मुलगी आढळली. पण या शस्त्रक्रियेनंतर श्वेताची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. पण काही दिवसांनी श्वेताचा मृत्यू झाला.
'5 जानेवारीला श्वेताला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं त्यानंतर मला तिला भेटताही आलं नाही. त्यानंतर रुग्णालयाकडून माझ्याकडे बिलाची मागणी झाली. मी तात्काळ पैसे जमा करण्यास नकार दिला. पण त्यानंतर काहीच वेळात श्वेताला मृत घोषित करण्यात आलं.' अशी माहिती श्वेताच्या वडिलांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्वेताच्या नातेवाईकांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement