एक्स्प्लोर
भारत-पाकिस्तान सीमेवर 14 फूट बोगदा
जम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा 14 फूट आहे. विशेष म्हणजे, अर्निया सेक्टरमध्ये युद्धासाठी या बोगद्यात आणून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

फोटो सौजन्य : एएनआय
श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा 14 फूट आहे. विशेष म्हणजे, अर्निया सेक्टरमध्ये युद्धासाठी या बोगद्यात आणून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मूमधील अरनिया सेक्टरमध्ये हा बोगदा आहे. भारतात येत्या काही दिवसांतच दिवाळी येऊन ठेपली आहे. या सण-उत्सवांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी हा बोगदा तयार केला गेला असल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या बोगद्यामुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला आहे. बीएसएफचे महानिरिक्षक राम अवतार यांनी सांगितलं की, भारत-पाक सीमेवर जवळपास एक डझन व्यक्तींची संशयास्पद हलचाल दिसून येत होती. जवानांना पाहताच या व्यक्तींनी तिथून पळ काढला. अवतार यांनी पुढे सांगितलं की, हा बोगदा तयार करण्याचे काम अपूर्ण असून, तो पाकिस्तानकडून खोदण्याचं काम सुरु होतं. याची उंची जवळपास 3 फूट आहे. तर रुंदी 2.5 फूट आहे. भारत-पाक सीमेवर बीएसएफच्या जवानांना शनिवारी सकाळी हा बोगदा आढळून आला.
दरम्यान, या बोगद्यातून काही शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून, यात अमेरिकन बनावटीचा कंपास, दोन मॅगजीन, 60 राऊंड विस्फोटक आणि एक हात बॉम्बचा समावेश आहे. तसेच या सर्व शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानचा शिक्का असल्याची माहितीही गस्ती प्रमुखांनी दिली.#Visuals of items recovered from tunnel unearthed by BSF in J&K's Arnia Sector. pic.twitter.com/eaAtpVQ4k6
— ANI (@ANI) September 30, 2017
आणखी वाचा























