India Corona Vaccination : भारतात 133 कोटी डोसेसचे वितरण, कोरोनाविरुद्ध लढाईत भारत वेगात
देशभरात कोविड-19 लसीचे (COVID19) 133 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यामध्ये अनेकांचे दोन्ही डोस तर काहींचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.
India Corona Vaccination : मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या (COVID19) लढ्याचा सामना करण्यासाठी कोरोना लसीकरण एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे देशभरात लसीकरण (COVID19 vaccine) मोहिमेचा वेग वाढविण्यात आला आहे. देशात लसीकरणासाठी पात्र असलेल्या 50 टक्केंहून अधिकांना दोन्ही डोसेज देण्यात आले आहेत. दरम्यान भारतात आतापर्यंत तब्बल 133 कोटी लशींचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लसीकरणात हिमाचल प्रदेश अग्रेसर
देशात आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशच्या नावे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरलं आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे.
ओमायक्रॉन वाढवतोय चिंता
देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 37 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय नागपूर, चंदीगढ आणि कर्नाटकमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या 37 इतकी झाली आहे.
संबंधित बातम्या
- Omicron Cases : देशातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 37, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
- Vaccine | लस खरेदीची आतापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
- Covid 19 Vaccine : भारतात अशी सुरुये कोरोना लसीच्या साठवणीची तयारी
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live