एक्स्प्लोर

10th August In History : ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांची दहशतवाद्यांकडून हत्या; आज इतिहासात

10th August In History : आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय बायो डिझेल म्हणून साजरा केला जातो. तर आजच्याच दिवशी भारतीय हिंदी साहित्याचे प्रख्यात विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्म झाला होता.

10th August In History :  इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आजच्या दिवशी ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. 'गान सम्राट' अशी ख्याती असणाऱ्या  उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म झाला होता. हिंदी साहित्यामध्ये ज्यांच्या साहित्यांनी लोकांना हसण्यास प्रवृत्त केलं अशा प्रसिद्ध विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा आज जन्मदिन. 

आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन  International Biodiesel Day

कोणत्याही वनस्पतीजन्य तेलावर प्रक्रिया करुन त्याचे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केल्यानंतर मिळणाऱ्या प्रक्रियेला बायो डिझेल म्हटलं जातं. जैवविविधेतेच्या मुद्द्यांवर लोकांना महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन म्हणून साजरा केला जातो. या इंधामुळे प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यास देखील मदत होते. 

1986 : जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या

जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म 27 जानेवारी रोजी अलिबागमध्ये झाला होता. जनरल अरुणकुमार हे भारतीय सैन्याचे 13 वे प्रमुख होते. भारत आणि पाकिस्तानच्या 1965 युद्धातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना  महावीर चक्र देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते. भारताने जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार राबवले तेव्हा अरुणकुमार वैद्य भारतीय सैन्याचे प्रमुख होते. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर जनरल अरुणकुमार हे पुण्यात स्थायिक झाले होते. त्यादिवशी बाजारातून घरी परत असताना दुचाकीवर आलेल्या दहशवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी अरुण वैद्य यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर काहीच काळामध्ये वैद्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यांच्या मारेकऱ्यांना त्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली होती. 

ऑपरेशन ब्लू स्टार हे अमृतसरमधील सुवर्णमंदिरात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात राबवण्यात आले होते. 3 जून ते 6 जून दरम्यान शीख दहशतवाद्यांनी अमृतसर सुवर्ण मंदिरात आपला तळ ठोकला होता. तेव्हा पंजाबमधील राजकीय परिस्थिती, त्यातून फुटीरतावाद्यांना मिळणारा पाठिंबा तसेच खलिस्तानची मागणी यामुळे पंजाबमधील परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली होती. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अखेरिस ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी भारतीय सैन्याला थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या दहशवाद्यांचे प्रमुख जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्यासह बरेच दहशतवादी मारेल गेले होते. त्यानंतर इतरांनी शरणागती पत्कारली होती.या ऑपरेशन ब्लूचे नेतृत्व जनरल अरुणकुमार वैद्या यांनी केले होते. 

1855: उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म

उस्ताद अल्लादियाँ खाँ यांची  कोल्हापूरच्या दरबारातील प्रभावशाली गायक म्हणून ख्याती होती. त्यांचा जन्म जयपूरमधील उनियारा येथे झाला होता. अल्लादियाँ यांना जहांगीर खान यांनी त्यांना संगीताचे धडे दिले. बारा वर्षे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर आपली पहिली मैफल त्यांनी  अजयगड येथे सादर केली होती. त्यांनी 1895 ते 1922 पर्यंत शाहू महारांजांच्या दरबारात संगीताची सेवा केली. 

 

विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्म

विडंबनकार म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली अशा  विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा आज जन्मदिन आहे. त्यांनी हिंदी साहित्यामध्ये अनेक विनोदी हिंदी लेखन केले आहे. हरिशंकर परसाई यांना त्यांच्या  विकलांग श्रद्धा का दौर या पुस्तकासाठी  1882 मध्ये  साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

इतर महत्त्वाच्या घडामोडी

1846 - युनायटेड स्टेट्स सरकारद्वारे प्रशासित संग्रहालये आणि संशोधन केंद्रांचा एक गट असलेल्या ‘स्मिथसोनियन संस्थेची’ स्थापना करण्यात आली.

1860 - भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाची रचना करणाऱ्या भारतीय संगीतशास्त्रज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्मदिन.

1962 - भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्मदिन.

1977 - पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय ध्वज गीत “विजयी विश्व तिरंगा प्यारा” गीताचे रचनाकार, कवी आणि गीतकार श्यामलाल गुप्ता यांचे निधन.

1999 - ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील आणि डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget