Pune ganeshotsav 2023 : पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला तर घाबरु नका; 'या' नंबरवर थेट कॉल करा...
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याची भीती असते. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि काही सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
पुणे : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक (Pune Ganeshotsav 2023) मोठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याची भीती असते. नागरिकांवर अशी कोणतीही परिस्थिती येऊ नये आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याची काळजी घेतली जाते. मात्र तरीही भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि काही सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक
020-25501269, 020-25506800
गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ः 9689931511
देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी ः 8108077779 आणि 020-26451707
अग्निशामक दल : 101
पोलिस हेल्पलाइन क्रमांक
नियंत्रण कक्ष : 100/112
ज्येष्ठ नागरिक : 1090
चाइल्डलाइन : 1098
महिला हेल्पलाइन :1091
व्हॉट्सॲप : 9875283100
वैद्यकीय ससून रुग्णालय :
020-26128000
रुग्णवाहिका : 108
ही काळजी नक्की घ्य़ा?
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 101 या क्रमांकावरून अग्निशामक दलाशी संपर्क साधा
गणेशमूर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरीपासून लांब उभे करा.
नाव, होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नका.
महापालिकेतर्फे नदीकाठी जीवरक्षक नियुक्त केले आहेत, त्यांच्याकडून मूर्तीचे विसर्जन करवून घ्या.
एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास जीवरक्षकांना तातडीने माहिती द्या.
पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरा.
अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या हौदातच करा.
प्रमुख विसर्जन घाट
संगम घाट
वृद्धेश्वर घाट/ सिद्धेश्वर घाट
अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ)
बापूघाट (नारायण पेठ)
विठ्ठल मंदिर (अलका चौक)
ठोसरपागा घाट
राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर
चिमा उद्यान येरवडा
वारजे कर्वेनगर, गल्ली क्रमांक 1 नदी किनार
नेने/आपटे घाट
ओंकारेश्वर
पुलाची वाडी, नटराज चित्रपटगृहामागे
खंडोजी बाबा चौक
गरवारे महाविद्यालयामागील बाजू
दत्तवाडी घाट
औंधगाव घाट
बंडगार्डन घाट
पांचाळेश्वर घाट
2000 गणपती मंडळांचं विसर्जन, 9 हजार पोलीस तैनात
पुण्यात दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. हाच उत्सव नीट पार पाडण्याची जबाबदारी पुणे पोलिसांची असते. 10 दिवस उत्तम कामगिरी पार पाडल्यानंतर पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. यात 29 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले. 28 तारखेला होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बीडीडीएस पथके, आरसीपी, क्युआरी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. 28 तारखेला जवळपास 2000 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल. विसर्जन मिरवणुकीसाठी 9 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष मिरवणूक मार्गावर असणार आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.