एक्स्प्लोर
उपचाराअभावी 10 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
लखनौः उत्तर प्रदेशमधील एका रुग्णालयात उपचारासाठी लाच न दिल्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने बालकाचा उपचार करण्यासाठी लाच मागितली, असा आरोप मृत बालकाच्या आई-वडिलांनी केला आहे.
आजारी पडल्यामुळे बाळाला मंगळवारी रुग्णालयात नेण्यात आलं. प्रकृती अधिक खालावल्यामुळे रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. मात्र भरती करण्यासाठी रुग्णालयात खाट शिल्लक नसल्याचं सांगून आई-वडिलांची अडवणूक केली.
काय आहे प्रकरण?
आई-वडिलांनी संबंधित कर्मचाऱ्याला तळमळीने विनंती केली. मात्र कर्मचाऱ्याने 30 रुपये दिल्याशिवाय खाट देणार नसल्याची गळ घातली. हतबल आई-वडिलांकडे पैसे नसल्यामुळे बाळाला भरती करता आलं नाही आणि उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला.
संबंधित कर्मचाऱ्याला हे प्रकरण समोर आल्यानंतर कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. तर चिल्ड्रन नर्सची बदली करण्यात आली असून चौकशी केली जात आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या मुख्य अधिक्षकांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement