(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Indapur : इंदापुरात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राडा, कोनशिलेवर सुप्रिया सुळेंचे नाव नसल्याचे शरद पवार गट आक्रमक
Indapur, Pune : इंदापूर (Indapur) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आज होणार होते. दरम्यान भुमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव नसल्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला. (Ajit Pawar)
Indapur, Pune : इंदापूर (Indapur) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आज होणार होते. दरम्यान भुमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव नसल्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला. (Ajit Pawar) अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये उद्घाटनावरुन तुफान राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा वाद इंदापुरात पाहायला मिळाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
इंदापुरात विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार होते. दरम्यान, या इमारतीच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्याने शरद पवार गट (Sharad Pawar) आक्रमक झाला.
शरद पवार गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर आंदोलनही सुरु केले. याच वेळी अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे भूमिपूजनाच्या ठिकाणी दाखल झाले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ दोन्ही गट आमने-सामने आल्याने दोन्ही गटात तुफान राडा झाला.
बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ तणाव
अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये राडा झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ तणाव निर्माण झाल होता. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद सुरु झाल्याने परिसरात बराच काळ तणाव होता. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.
आमदार दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये झालेल्या वादाबाबत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव घाई गडबडीत कोनशिलेवर लिहायचे राहिले आहे. ते आगामी काळात दुरुस्त करण्यात येईल, असे आमदार भरणे यांनी स्पष्ट केले.
घाटी रुग्णालयातील प्रकरणानंतर सुप्रिया सुळे आक्रमक
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीमध्ये एका डॉक्टरांच्या डोक्याला देखील रॉड लागला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज (दि.12) घाटी रुग्णालयाला भेट देऊन जखमी डॉक्टर महिलेची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस ,हसन मुश्रीफ यांच्या भेटीसाठी वेळ मागणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, घाटी रुग्णालयात घडलेली घटना चुकीची आहे. याबाबत सर्व माहिती घेतली. शहरात गुन्हेगारी वाढली आहे. मी उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीम यांच्या भेटीची वेळ मागणार आहे. त्यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे. डॉक्टरांवर झालेला हल्ला निंदनीय आहे. गृहमंत्रालयाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
सगळेच पात्र, तर मग लढाई कशासाठी? सुप्रिया सुळे संतप्त, नार्वेकरांचा निकाल हा उद्धव ठाकरेंचा विजय