IAS Ashok Khemka: 34 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 57 वेळा बदली;भूपेंद्र हुड्डा, रॉबर्ट वाड्रासह अनेकांना धारेवर धरणारे IAS अशोक खेमकाची आज सेवानिवृत्त
Who is Ashok Khemka: वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका हे आज (30 एप्रिल) बुधवारी निवृत्त होत आहेत. आपल्या कारकिर्दीत ५७ वेळा बदलीचा सामना करणारे खेमका हे त्यांच्या प्रामाणिक वृत्तीसाठी ओळखले जातात.

Who is IAS Ashok Khemka: आपल्या प्रामाणिकपणामुळे संपूर्ण कारकिर्दीत 57 वेळा बदली झालेले वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका (IAS Ashok Khemka) आज (30 एप्रिल) बुधवारी निवृत्त होत आहेत. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांची कंपनी स्कायलाईट आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यातील २००८ मध्ये झालेल्या वादग्रस्त जमीन व्यवहाराचा पर्दाफाश करणारे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. अशोक खेमका आज बुधवारी निवृत्त होत आहेत. 1991च्या बॅचचे अधिकारी अशोक खेमका यांना डिसेंबर 2024 मध्ये परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि आता ते आज म्हणजेच बुधवारी त्याच पदावरून निवृत्त होत आहेत.
हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी खेमका हे त्यांच्या बदल्यांसाठी ओळखले जातात.2012 मध्ये काँग्रेस नेते आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांच्याशी संबंधित गुरुग्राम जमीन व्यवहारातील उत्परिवर्तन रद्द केल्याने खेमका हे चर्चेत आले होते. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असलेले अशोक खेमका त्यावेळी सर्वाधिक चर्चेत होते.
भूपेंद्र हुड्डा, रॉबर्ट वाड्रासह अनेकांना धारेवर धरणारे IAS अशोक खेमकांची ओळख
आयएएस अधिकारी अशोक खेमका यांचा जन्म 30 एप्रिल 1965 रोजी कोलकाता येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, खेमका यांनी 1988 मध्ये आयआयटी खरगपूर येथून कंप्यूटर अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून संगणक विज्ञानात पीएचडी आणि व्यवसाय प्रशासनात एमबीए केले. याशिवाय, प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी पंजाब विद्यापीठातून एलएलबी देखील पूर्ण केले.
वारंवार बदल्यांच्या मालिकांच करावा लागला सामना
आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत 57 बदल्यांसाठी प्रसिद्ध झालेले खेमका यांना खट्टर सरकारने परिवहन विभागातून बदली केली, हे पद त्यांनी स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच पुन्हा बदली झाली. जवळजवळ दहा वर्षांनंतर, डिसेंबरमध्ये, त्यांना पुन्हा वाहतूक विभागात आणण्यात आले. २०२३ मध्ये, खेमका यांनी एकदा तत्कालीन मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र लिहून राज्य दक्षता विभागात पोस्टिंगची मागणी केली होती आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची विनंती केली होती.
हरियाणात यावर्षी 9 आयएएस अधिकारी होणार निवृत्त
हरियाणा राज्यातील नऊ आयएएस अधिकारी या वर्षी निवृत्त होणार आहेत. यामध्ये मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांचा समावेश आहे. ते 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. विवेक जोशी भारताचे निवडणूक आयुक्त झाल्यानंतर रस्तोगी यांना मुख्य सचिव बनवण्यात आले. विवेक जोशी यांनी अकाली निवृत्ती (VRS) घेतली होती. भिवानीचे उपायुक्त महावीर कौशिक हे देखील 30 जून रोजी मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांच्यासह निवृत्त होणार आहेत. त्यांच्या आधी ग्रामीण विकास विभागाचे संचालक आणि विशेष सचिव जय कृष्ण आबीर 31 मे रोजी निवृत्त होतील. सहकारी संस्थांचे निबंधक राजेश जोगपाल 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होतील. जोगपाल हे अन्न आणि पुरवठा विभागाचे संचालक देखील आहेत. परिवहन विभागाचे महासंचालक सुजन सिंह 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत.गुरुग्राम महानगरपालिका आयुक्त अशोक कुमार गर्ग 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. अशोक कुमार गर्ग यांच्याकडे गुरुग्राम जिल्ह्याचे डीएमसी (जिल्हा महानगरपालिका आयुक्त) ही जबाबदारी देखील आहे.
हे ही वाचा
- Justice Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती; 14 मे रोजी घेणार शपथ























