Parbhani News : परभणीच्या मानवतमध्ये भयंकर प्रकार, शाळेत पाऊल ठेवताच विद्यार्थी बेशुद्ध, नक्की काय घडलं?
Parbhani: परभणीच्या मानवत तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत आले की चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आल आहे.

Parbhani News : परभणीच्या मानवत तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत आले की चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आल आहे. या प्रकाराने शिक्षक, पालक अन् गावकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे पथकही चक्रावून गेले आहे. या विद्यार्थ्यांच्या विविध तपासण्यासध्या केल्या जात आहेत. मात्र नेमका हा प्रकार काय हे अद्याप कळू शकलेले नाहीये.
पुढे आलेल्या माहितीनुसार, परभणीच्या मानवत तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग असून यामध्ये एकूण 180 विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील पाचवी आणि तिसरी मधील सहा ते सात विद्यार्थी शाळेत आल्यानंतर अचानकपणे चक्कर येऊन बेशुद्ध होत आहे. तर घरी गेल्यानंतर तोंडावर पाणी मारले की हे विद्यार्थी पूर्वस्थितीत येत आहेत. शाळेत गेल्यानंतरच हा प्रकार का होतोय? ज्यामुळे पालक असतील शाळेतील शिक्षक असतील तसेच आरोग्य विभागाचे पथकही चक्रावून गेले आहे.
कन्व्हर्जन डिसऑर्डरमुळे हा प्रकार, मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
या प्रकारानंतर गावातील शाळेत जाऊन जिल्हा मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी करून तपासण्या केल्या आहेत. हा कॉन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणजेच रूपांतरण विकार असल्याचे मानसिक आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. हा काऊनसेलिंगनेच बरा होतो आणी आम्ही जेंव्हापासून त्यांची काऊनसेलिंग सुरू केली आहे तेंव्हापासून त्यांना चक्कर येत नसल्याचे डॉ नरवाडे यांनी सांगितले आहे. मात्र अशा प्रकारची घटना जिल्ह्यात प्रथमच घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे कन्व्हर्जन डिसऑर्डरमुळे हा प्रकार होत असून घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही मानसिक आरोग्य अधिकारी म्हणाले आहे.
जिल्ह्यातील 7 नगरपालिकांना 42 फायर प्रॉक्झिमिटी सुटचे वितरण
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील ब आणि क दर्जाच्या नगरपरिषदांना ट्रिपल लेअर फायर प्रॉक्झिमिटी सुट चे वाटप करण्यात आले आहे सात नगरपालिकांना प्रत्येकी ६ असे जवळपास 42 सूटचे वाटप परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तसेच मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या सूट चा वापर कसा करायचा याबाबत अगोदर प्रशिक्षण देऊन त्यानंतर हे सूट वाटप करण्यात आले आहेत महत्त्वाचे म्हणजे आग लागण्याच्या घटनांमध्ये आता अग्निशमन दलाच्या जवानांची होणारी गैरसोय दूर होणार असून जवानांच्या सुरक्षिततेसाठी हे सूट अत्यंत महत्त्वाचे आहेत.
हे ही वाचा























