Suryakanta Patil : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी उलथापालथ, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी पक्ष सोडला
Suryakanta Patil Resigns From BJP : सूर्यकांता पाटील यांनी 2014 साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हिंगोली मतदारसंघातून त्यांनी लोकसभेचं तिकीट मागितलं होतं.
![Suryakanta Patil : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी उलथापालथ, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी पक्ष सोडला Suryakanta Patil resigns from bjp Maharashtra after lok sabha election result nanded hingoli politics marathi news update Suryakanta Patil : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी उलथापालथ, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी पक्ष सोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/ee0aaa1be6f309586a3ce5deec188dab171905941235593_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 10 वर्षात मला खूप काही शिकायला मिळालं, मी पक्षाची आभारी आहे असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं होतं. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असून मी पक्षाची आभारी आहे. आता मी आपला निरोप घेते असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सूर्यकांता पाटील यांच्यावर निवडणूक प्रमुख हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची जवाबदारी पक्षाने दिली होती.
"आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली"
हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचं तिकीटासाठी त्या आग्रही होत्या. पण ती जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने त्यांना तिकीट मिळालं नाही. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली होती.
सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्या ग्रामविकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले होते.
हदगाव मतदारसंघातून 1980 साली सूर्यकांता पाटील या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या. 1991, 1998 आणि 2004 असे तीन वेळा त्या लोकसभेत खासदारपदी निवडून आल्या.
कोण आहेत सूर्यकांता पाटील? (Who Is Suryakanta Patil)
- 1970-1972 - जनसंघ नेत्या, भाजप महिला आघाडी प्रमुख.
- 1974 नांदेड काँग्रेस नांदेड पलिकेसाठी उमेदवारी (8 वर्ष नगरसेविका)
- 1980 हदगाव विधानसभेमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकल्या.(1980-1985 साली विधानसभा सदस्य)
- 1986 राजीव गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर घेतले.
- 1991 साली नांदेड लोकसभा काँग्रेसकडून 1लाख 37 हजार विक्रमी मतांनी विजयी.
- 1996 साली काँग्रेसकडून हिंगोली लोकसभा निवडणूक लढली आणि विजयी झाले .
- 1999 वर्षी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
- 1998 साली राष्ट्रवादीकडून हिंगोली लोकसभा लढवली, विजयी झाल्या.
- 2004 राष्ट्रवादीकडून लोकसभा सदस्य.
- 2009 राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.
- 2014 पर्यंत राष्ट्रवादीत राहिल्या .
- 2014 साली काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिल्याने, त्यांनी भाजपात प्रवेश केला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)