Maharashtra Politics : भाजपातील मोठ्या नेत्याची नाराजी, उमेदवारी न मिळाल्याची खंत फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली
Maharashtra Politics : आयुष्याची शेवटची लोकसभा लढवायची राहून गेली असं देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे.
Maharashtra Politics : निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपमधील (BJP) अनेखी एका नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी खासदार सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) तिकीट न मिळाल्याची खंत फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) व्यक्त केली आहे. आपल्या लोकसभा मतदार संघात आपल्याला जबरदस्तीने दूर लोटतय, तीन लोकसभा जिथून जिंकल्या, एक हरले तरी माझा संपर्क तुटला नाही. स्नेहबंध अधिकच घट्ट झाले. तसेच, आयुष्याची शेवटची लोकसभा लढवायची राहून गेली असं देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे.
सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्या राज्यमंत्री देखील राहिल्या आहेत. यंदाची लोकसभा निवडणुकीत हिंगोलीमधून भाजप पक्षाची उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिंदेसेनेकडे असल्याने भाजपला या मतदारसंघात आपला उमेदवार देता आला नाही. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने सूर्यकांता पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहत आपल्या मनातील भावनांन वाट मोकळी करून दिली आहे.
काय लिहलंय फेसबुक पोस्टमध्ये?
आज उगाच असे वाटले की, मला जबरदस्तीने कोणी माझ्या लोकसभा मतदारसंघातून दूर लोटत आहे. मी तीन लोकसभा जिथून लढल्या, जिंकल्या आणि एक हारले तरीही माझा संपर्क तुटला नाही, स्नेहबंध अधिकच घट्ट झाले. आयुष्यातली शेवटची लोकसभा लढायची राहून गेली, man praposes God disposes या उक्तीनुसार मी आता पुन्हा कधीच हिंगोली लोकसभा लढणार नाही. जातीपाति बाहेरच राजकारण करणारी मी तशीही सध्याच्या वातावरणात ऍडजेस्ट झाले नसतेच. पण 30 वर्ष राबूनही मी केलेले कष्ट वाया गेले असे मला वाटले देखील नाही, मी रुसूनही बसले नाही, चुपचाप माझ्यावर होतं असलेला अन्याय बघत बसले, कधीच त्रागा केला नाही.
जे काम सांगते पार्टी, ते मी केले करीत आहे. पण माझे नाते जुळलेच नाही. रंगरूपही समरसले नाही. त्यानी स्वीकारले नाही मी धिक्कारले नाही. आता वाटते माझी 10 वर्ष अश्या प्रकारे नष्ट करण्याचा अधिकार न त्याना होता न मला होता. माझ्यासारख्या सामाजिक व्यक्तीला तर अजिबात नव्हता. मी स्वस्थ नाही अस्वस्थ आहे. शायद गाडी रुख बदलणा छाहती है. मैं बहती धारा मुझे रोकणे की शक्ती किसीमे नही. मी परवा मुंबईला आले, ट्रेनमध्ये काही अनोळखी लोक डब्ब्यात बोलत होते. यांना बघेल्यासारखं वाटते पण त्या निवडणुकीत सहभागी का नाहीत. एकट्याच कुठे निघाल्यात, सोडायला खूप लोक होते. वगैरे वगैरे. मला राहवले नाही, मी म्हंटले मी माझी ओळख देते. माझं नावं सूर्यकांता पाटील... आणी त्याना किती आनंद झाला की, ते मुंबईपर्यंत सोबत आहे. त्यांच्यातील एकजण म्हणाला ताई मी आपल्याला नाशिकच्या सभेत ऐकले. आपली शैली महाराष्ट्रात कुणाला नाही. मग आपण निवडणूक का टाळीत आहात? मी म्हंटले मी भाजपच्या यार्डस्टिकमध्ये बसत नाही. आणी म्हणून मी गेली 10 वर्ष निवांत आहे.....
कोण आहेत सूर्यकांता पाटील?
- जनसंघ विद्यार्थी नेता
- 1970-1972 भाजप महिला आघाडी प्रमुख
- 1974 नांदेड काँग्रेस नांदेड पलिकेसाठी उमेदवारी (8 वर्ष नगरसेवक)
- 1980 हदगाव विधानसभा काँग्रेसकडून लढली (1980-1985 साली विधानसभा सदस्य)
- 1986 राजीव गांधी यांनी राज्यसभेवर घेतले
- 1991 साली नांदेड लोकसभा काँग्रेसकडून 1लाख 37 हजार विक्रमी मतांनी विजयी
- 1996 ला काँग्रेसकडून हिंगोली लोकसभा निवडणूक लढली आणि विजयी झाले
- 1999 वर्षी राष्ट्रवादीत प्रवेश केला
- 1998 साली राष्ट्रवादीकडून हिंगोली लोकसभा लढवली विजयी
- 2004 राष्ट्रवादीकडून लोकसभा सदस्य
- 2009 राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक पराभव झाला
- 2014 पर्यंत राष्ट्रवादीत राहिल्या
- 2014 ला राजीव सातव यांना उमेदवारी दिल्याने, भाजपात प्रवेश
इतर महत्वाच्या बातम्या :