![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahayuti Seat Shearin Dispute : हिंगोलीत महायुतीची चिंता वाढली, एकाचवेळी भाजपमधील तिघांची बंडखोरी; आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदे गटाचे बाबूराव कदम रिंगणात असतांना, भाजपच्या तीन नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले आहेत.
![Mahayuti Seat Shearin Dispute : हिंगोलीत महायुतीची चिंता वाढली, एकाचवेळी भाजपमधील तिघांची बंडखोरी; आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस Mahayuti Seat Shearin Dispute BJP leaders Rebellion in Hingoli In Lok Sabha Election Today is last day to withdraw nomination form marathi news Mahayuti Seat Shearin Dispute : हिंगोलीत महायुतीची चिंता वाढली, एकाचवेळी भाजपमधील तिघांची बंडखोरी; आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/e34667f3b93fe416af71329c5e8a60931712553541036737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election 2024 : राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, हिंगोलीत (Hingoli) देखील भाजपच्या (BJP) तीन नेत्यांनी एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीची चिंता वाढवली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency) जागा महायुतीमध्ये (Mahayuti) शिवसेनेच्या (Shiv Sena) वाट्याला गेली आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या (BJP) तीन नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी (Independent Candidate) दाखल केली आहे.
भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, आध्यात्मिक आघाडीचे योगी शाम भारती महाराज आणि भाजप नेते शिवाजीराव जाधव या तीन नेत्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे महायुतीत शिंदे गटाचे नेते बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात भाजप नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे. तर, आज उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे भाजपचे बंडखोरी करणारे नेते नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी अर्ज घेण्याची विनंती...
भाजप लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुलतानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, तो उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी रविवारी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी तब्बल अडीच तास रामदास पाटील यांच्या घरी बंद दाराआड चर्चा झाली आहे. भाजपच्या सर्व नेते मंडळींनी रामदास पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना उमेदवारी अर्ज घेण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत तुमचा निर्णय कळवा असे सुद्धा गिरीश महाजन यांनी रामदास पाटील यांना कळवले होते. त्यामुळे रामदास पाटील आज काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
बंडखोरीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया....
हिंगोलीमध्ये भाजपच्या तीन नेत्यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी त्यांची रविवारी भेट घेतली. या भेटीनंतर बोलतांना म्हणजे म्हणाले की, "भाजपचे प्रमुख पदाधिकारी किंवा नेत्यांनी फॉर्म भरून ठेवले होते. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. तिन्ही नेत्यांशी चर्चा झाली आहे. तसेच योगी श्याम भारती महाराज यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून ते काम करतायेत. त्यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांचे फॉलोअर्स मोठ्या संख्येमध्ये असून, त्यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, महायुतीत ही जागा शिवसेनेकडे असून, कोणताही बदला झालेला नाही. शिवसेनेची ही जागा असल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकत नाहीत. ही जागा भाजपकडे असती, तर आम्ही निश्चित त्यांचा विचार केला असता. आपण एकाच विचारतून जाऊ, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मताचा विभाजन होऊ नयेत. एक एक जागा आपल्यासाठी महत्वाची आहे. मोदीजीला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असल्याचे सांगत त्यांना विनंती केली आहे. सकारात्मक चर्चा झालेली आहे,” असे गिरीश महाजन म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : भाजपला आणखी एक झटका! हेमंत पाटलांना विरोध करणाऱ्या रामदास पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)