एक्स्प्लोर

ऑन ड्युटी पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत तर्रर्र, उभं राहणं झालं अवघड; वरिष्ठांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Hingoli Crime News : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो हिंगोली शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. 

Hingoli Crime News : हिंगोली पोलीस (Hingoli Police) दलात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कारण एका सहायक पोलीस निरीक्षक चक्क ड्युटीवर मद्यधुंद अवस्थेत आढळून आला आहे. रात्रीच्या गस्तीवर निघालेला हा पोलीस अधिकारी एवढी दारू प्यायला होता की, त्याला नीट उभं राहणं अवघड झाले होते. दरम्यान गस्तीवर असताना एका पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी गेलेल्या या पोलीस अधिकाऱ्याची अवस्था पाहून त्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे अखेर याची माहिती वरिष्ठांना देऊन या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो हिंगोली शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गिरी हे हिंगोली शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत  आहे. तर 9 एप्रिलला त्यांची नाईट ड्युटी लागली होती. त्यामुळे ते जिल्हा रात्री गस्तीवर होते. दरम्यान गस्तीवर असताना गिरी हे रात्री 1.55 वाजता रात्रगस्त चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र पोलीस ठाण्यात जाताच त्यांची अवस्था पाहून ठाण्यातील पोलिसांना धक्काच बसला. कारण गिरीला व्यवस्थितपणे चालता येत नव्हते. तो बोबड्या भाषेत बोलत होते. तसेच उग्र वास येत असल्याने त्यांनी प्रचंड मद्यपान केल्याचे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आहे. 

वरिष्ठांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

रात्रगस्त चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात आलेल्या सुनील गिरी याने अधिकची दारू प्यायलाचे लक्षात येताच, औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी सदरची बाब वरिष्ठांना कळवली. तसेच  गिरी यांना व्यवस्थितपणे चालता येत नसल्याचे देखील कळवले. त्यामुळे वरिष्ठांनी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्याने सुनील गिरी विरोधात औंढा पोलीस ठाण्यात कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी दिलीप किशनराव नाईक यांच्या फिर्यादिनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक झुंजारे करत आहेत. तर गुन्हा दाखल केल्यावर गिरीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. 

पोलीस दलात खळबळ...

रात्रीच्यावेळी सर्वसामान्य सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून रात्रीची गस्त केली जाते. तसेच रात्री-बेरात्री अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला पोलीस धावून येतात. तसेच रात्री दारू पिऊन रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई देखील करतात. मात्र हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी हे स्वतःच पोलीस गस्तीवर असताना दारूच्या नशेत आढळून आले आहेत. गिरी यांनी एवढ्या मोठ्याप्रमाणावर मद्यपान केले होते की, त्यांना स्वतः उभं राहणं अवघड होत होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून नागरिकांनी मदतीची काय अपेक्षा ठेवावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गिरीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Unseasonal Rain : मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; संभाजीनगर, बीडसह हिंगीलो जिल्ह्याला मोठा फटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget