एक्स्प्लोर

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी हिंगोली जिल्ह्यात 13 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 Hingoli News : सणासुदीच्या काळात शुल्लक कारणावरुन उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हिंगोली : पुढील काही दिवसांत अनेक सण साजरे केले जाणार आहेत. तर, गणेश उत्सव (Ganeshotsav), ईद ए मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त जिल्ह्यात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात येते. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात येतो. परंतु, गणेश उत्सव, ईद ए मिलाद सणाच्या काळात शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशाप्रकारे अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता आहे. त्यामुळे अशी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत 13 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्सव काळात उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे.  सणासुदीच्या काळात शुल्लक कारणावरुन उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची यादी...

  • हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती. 
  • हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी यांची नियुक्ती.
  • नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड यांची नियुक्ती.
  • बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार नकुल पोळेकर यांची नियुक्ती.
  • वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची यांची नियुक्ती. 
  • वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने यांची नियुक्ती.
  • हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी यांची नियुक्ती.
  • कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग यांची नियुक्ती.
  • कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील मोरे यांची नियुक्ती.
  • बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची नियुक्ती.
  • औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विठ्ठल परळीकर यांची नियुक्ती.
  • सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सखाराम मांडवगडे यांची नियुक्ती.
  • गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय आपल्या कार्यक्षेत्रातही नियंत्रण ठेवावे....

तर, नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Hingoli : मोर्चा करून परत जात असलेला टेम्पोचा पलटला, वंचितचे 40 कार्यकर्ते जखमी, 35 महिलांचा समावेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget