Rohit Pawar : भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवार नेमकं म्हणाले काय?
Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना फडणवीसांकडे राजीनामा मागावा अशी मागणी केलीये.
हिंगोली : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काम करत असलेली शिंदे समिती (Shinde Samiti) रद्द करण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलीये. त्यावरु राज्यात सध्या दावे - प्रतिदावे यांचा ओघ सुरु झालाय. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी छगन भुजबळांनी फडणवीसांचा राजीनामा मागावा अशी मागणी केलीये. बीडमध्ये (Beed) झालेली जाळपोळ हे गृहविभागाचं अपयश असल्याचं देखील यावेळी रोहित पवारांनी म्हटलं. त्यामुळे याच मुद्द्याला धरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा राजीनामा छगन भुजबळांनी मागावा. भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत, त्यांचं फडणवीसांनी ऐकावं, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वात जास्त परिणाम हा बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. त्यातच बीडमधील जाळपोळीची घटना ही गृहमंत्रालयाचा अपयश असल्यची विधानं विरोधी पक्षांकडून वांरवार केली जातायत. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही हिवाळी अधिवेशनात राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेची जुडिशन चौकशी करण्याची मागणी देखील करणार असल्याचं यावेळी रोहित पवारांनी म्हटलं.
भुजबळ नको तिथे बोलतात - रोहित पवार
भुजबळ हे सध्या सत्तेत आहेत. ते स्वत: मंत्री असून संविधानिक पदावर ते बसलेत. ही समिती कॅबिनेटच्या मदतीनेच गठीत केली जाते. कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. जिथे भुजबळ स्वतः होते. मग रस्त्यावर येऊन बोलण्यापेक्षा तुम्ही कॅबिनेटमध्ये बोलायला हवं होतं. जिथे बोलायला हवं तिथे बोलत नाहीत, नको तिथे बोलतात. हा वाद जर पेटत असेल तर कुठेतरी ही स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी पाठवली काय असा प्रश्न निर्माण होतोय, असं रोहित पवारांनी म्हटलं.
भुजबळांना जो अर्थ काढायचा तो त्यांनी काढावा
मी आणि माझ्या कुटुंबांनं बारामतीत साजरी न करता संदीप क्षीरसागर आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं कार्यायल जाळण्यात आलं, त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली. जे जाळलं जाऊ शकतं, ते उभंही केलं जाऊ शकतं. त्यामुळे भुजबळ जे काही बोलतात, त्याला काहीही अर्थ नाही, असं टोला रोहित पवारांना भुजबळांना लगावला आहे.