Hingoli : एका हातात पेट्रोल तर दुसऱ्या हातात माईक, ऊसाचे पैसे थकवल्यानं भाजप नेत्यासमोरच शेतकऱ्याचा आक्रमक बाणा
अद्याप काही कारखान्यांनी मागील वर्षीच्या ऊसाची एफआरपी दिली नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसतायेत.
Hingoli News : यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्याची वेळ आली तरी अद्याप काही कारखान्यांनी मागील वर्षीच्या ऊसाची एफआरपी दिली नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसतायेत. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कान्याखान्याची सर्वसाधारण सभेत घडला आहे. ऊसाचे थकीत पैसे द्या, नाहीतर अंगावर पेट्रोल ओतून घेतो असा थेट इशाराच शेतकऱ्यानं भाजप नेत्याला दिला आहे.
पैसे मिळणार नसतील तर मी आत्महत्या करतो
टोकाई सहकारी साखर कान्याखान्याची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला त्या शेतकऱ्याचे पैसे अजूनही साखर कारखान्याकडे थकित आहेत. ते पैसे मिळावे यासाठी आज या सभेमध्ये एक शेतकरी चक्क पेट्रोलची बॉटल घेतात घेऊन दाखल झाला होता. जर पैसे मिळणार नसतील तर मी आत्महत्या करतो आसा पवित्रा यावेळी या शेतकऱ्याने घेतला होता.
शेतकऱ्यांची तब्बल 29 कोटी रुपयांची FRP थकीत
टोकाई सहकारी साखर कान्याखान्यावर आता भाजपचे नेते शिवाजीराव जाधव यांची सत्ता आहे. चेअरमन पदावर ते स्वतः विराजमान झाले आहेत. या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची तब्बल 29 कोटी रुपयांची FRP थकीत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: