एक्स्प्लोर

Hingoli News : चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं! पुढे काय झालं?

Hingoli News : यंदा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई दिवाळी आगोदर मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना एका चिमुकल्याने पत्र लिहून केली आहे. या पत्राती दखल मुख्यमंत्री घेणार का?

Hingoli News : पिकाच्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळावी, जेणेकरुन आई पुरणपोळ्या करेल, असं म्हणत हिंगोलीतील (Hingoli) एका सहावी इयत्तेमधील विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं. एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने या बातमीची दखल घेत अधिकारी त्या चिमुकल्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी काल (10 ऑक्टोबर)  या मुलाच्या घरी भेट देत अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतापचे वडील जगन कावरखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निकषात बसत असेल तर प्रतापला लवकरच घरकुलातून घर बांधून दिले जाणार आहे आणि प्रतापच्या घराचा प्रश्न मिटणार आहे.

शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हिंगोलीतील गोरेगाव येथील सहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी प्रताप कावरखे याने तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. "या वर्षी शेतातील सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झालं आहे. त्यामुळे खर्चाला सुद्धा पैसे मिळत नाहीत. दसऱ्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाहीत. इथे विष खायला पैसे नाहीत तर पुरणपोळी कुठे करणार असं आई म्हणत आहे. बँकेचे अनुदान आले की दिवाळीला पुरणपोळी करु, असं आई म्हणते. गावाजवळील एका गावात शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांना खाऊसाठी पैसे मागितले तर त्याच्या वडिलांनी फाशी घेतली. म्हणून मी बाबाकडे पैसे मागत नाही. परंतु मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी पाहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग आई दिवाळीला पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायला," असं या चिमुकल्याने पत्रात लिहिलं आहे.

मुख्यमंत्री, कृषीमंत्री पत्राची दखल घेणार?
चिमुकल्याचं हे पत्र मुख्यमंत्र्यांना मिळालं की नाही हे अजून स्पष्ट नाही. परंतु पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. यानंतर लोकांकडून मदत मिळू लागला. मात्र सरकारी मदत अद्याप मिळाली नाही. आता सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी भेट दिल्यानंतर घराचा पश्न मिटेल असं वाटत आहे. परंतु शेतीच्या नुकसानीचं अनुदान बँकेत जमा कधी होईल याबाबत प्रश्नच आहे. प्रताप कावरखेच्या या पत्राची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार घेणार हे पाहावं लागेल.

Hingoli News : चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं! पुढे काय झालं?

एकनाथ शिंदे
सायेब, मंत्री, मूंबई
माहे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी हाय, असं बाबा म्हनतात. मी बाबाले म्हणल की मले गूपचूप खायले पैसे द्या म्हया संग भांडन करतात. म्हनतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली, वावर इकतो देतो तूले दहा रुपये. आईन दसऱ्याले पूरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथ इश खायला पैसे नाहीत. वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्या कामाले जातात. मी आईला म्हणत आपल्याले दिवाळीले पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनूदान आलं की करु पोळ्या. सायब आमच्या घरी सनाल्या पोळ्या करायले पेसे नाहीत. आम्हाले घर नाही, आम्हाले काहीत नाही. मी बाबा संग भांडन केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या जयपूरच्या गावात शेतकरी त्याच्या पोरान पेसे माघतल्या मनून फासी घेतली आता मी बाबाले पेसे नाहीत मागत. सायेब आमच घर पाहा की तूम्ही या आनूदानचे पेसे लवकर द्या. मग दिवाळीले आई पोळ्या करते. तूम्ही या पोळ्या खायले, सायेब

तुमचा आणी बाबाचा लाडका
प्रताप कावरखे, वर्ग 6
जी.प. शाला गोरेगाव 
हींगोली

VIDEO : Farmer Son letter to CM : सायेब, अनुदान द्या..., हिंगोलीतील शेतकरीच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget