एक्स्प्लोर

K.P.B हिंदुजा महाविद्यालयात 'मंथन 2026', सुर -तालांची रंगणार रंगतदार मेजवानी

Manthan 2026: हिंदुजा कॉलेजमध्ये ‘मंथन 2026’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Manthan 2026: मुंबईच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळातर्फे वार्षिक आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘मंथन 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव खास 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव यंदा “सुर आणि ताल” या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

संगीत ही केवळ कला नसून ती संस्कृतीची ओळख आहे, हा संदेश ‘मंथन 2026’ मधून अधोरेखित करण्यात येणार आहे. सुरांमधून भावना व्यक्त होतात, तर तालातून जीवनाची गती उमटते. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, भक्ती, भावगीत तसेच आधुनिक संगीत यांचा सुरेख समतोल या दोन दिवसीय महोत्सवात अनुभवता येणार आहे. ‘मंथन’ हा केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नसून तो विचार, भावना, कला आणि प्रतिभेचे सर्जनशील व्यासपीठ आहे. गेल्या काही वर्षांत या महोत्सवाने मुंबईसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली असून, या मंचावर सहभागी होणे अनेक विद्यार्थ्यांसाठी मानाची बाब मानली जाते.

महोत्सवात साहित्यिक कला, ललित कला, सादरीकरण कला आणि अनौपचारिक स्पर्धा अशा विविध विभागांतील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विचार मंथन (एक्स्टेम्पोर), शब्दांची अदलाबदल (भाषांतर), काव्य प्रवाह (कविता लेखन) आणि शब्दांची ओघ (पत्रलेखन) यांसारख्या साहित्यिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला आणि विचारक्षमतेला चालना मिळणार आहे.

ललित कला विभागात मंडला आर्ट, व्यंगचित्र, लिपण आर्ट आणि फेस पेंटिंग यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. सादरीकरण कलांमध्ये डान्स बॅटल ‘रिदम रंबल’, जंक बँड ‘नाद निनाद’, शो-डाउन ‘सूर दंगल’ आणि लावणी ‘लावणीचा ठसका’ या रंगतदार स्पर्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित ‘Mr. & Miss. मंथन’ ही स्पर्धा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

महोत्सवाचा कळस म्हणजे फॅशन शो ‘रंगमंच रनवे’. ‘Symphony of Styles’ या थीमवर आधारित हा फॅशन शो गट पद्धतीने सादर करण्यात येणार असून, विविध शैली, परंपरा आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम यातून अनुभवता येणार आहे. हिंदुजा कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची सर्जनशील ऊर्जा यांचा संगम म्हणजे ‘मंथन’. आयोजन समिती, मराठी वाङ्मय मंडळ आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमातून ‘मंथन 2026’ हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Embed widget