Hair Care Tips : लांब आणि मजबूत केस मिळविण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा; आठवड्याभरात परिणाम दिसेल
Hair Care Tips : केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्यानेही आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो.
Hair Care Tips : प्रत्येक मुलीला सुंदर, दाट आणि घनदाट केस (Hair Care Tips) हवे असतात. पण, आजकाल लांब आणि दाट वाढवणं फरा कठीण होऊन जातं. याचं कारण म्हणजे लोकांची बिघडलेली जीवनशैली (Lifestyle). अयोग्य आहार, अपुरी झोप आणि वाढतं प्रदूषण याचा परिणाम कळत नकळतपणे आपल्या आरोग्यावर तसेच केसांवर होतो. याशिवाय अनेकजण केसांवर अनेक प्रकारचे रासायनिक प्रोडक्ट्स वापरतात. या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्यानेही आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो. अशा वेळी जर तुम्हाला तुमचे केस मजबूत करायचे असतील तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची केसगळती कमी होण्यास मदत होईल.
केसांना तेल लावणं फार गरजेचं
तुमचे केस जर तुम्हाला मजबूत आणि घनदाट हवे असतील तर त्यासाठी केसांना तेल लावणं फार गरजेचं आहे. तेल लावल्याने केसांना पोषण मिळते. याबरोबरच केसांची चमकही वाढते. केस धुण्याच्या 2 ते 3 तास आधी तुम्ही केसांना तेल लावू शकता.
कांद्याचा रस वापरा
कांद्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर मानले जातात. अशा परिस्थितीत कांद्याचा रस केसांना लावल्याने केस लांब आणि दाट होतात.
मेथीचे दाणे फायदेशीर
मेथीचा वापर केसांसाठी फार फायदेशीर ठरतो. मेथीमध्ये प्रथिने, लोह आणि निकोटीनिक ॲसिड आढळतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे वापरण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना लावा.
कोरफड जेल वापरा
केसांच्या वाढीसाठी तुम्ही कोरफड जेलचा देखील वापर करू शकता. कोरफडीचे जेल केसांवर लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होईल. याबरोबरच केसांची वाढही होईल.
मजबूत केसांसाठी 'या' गोष्टी खा
तुम्हाला जर मजबूत केस हवे असतील तर त्यासाठी तुमचा आहार निरोगी असणं फार गरजेचं आहे. केस मजबूत करण्यासाठी तुम्ही आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. केसांच्या वाढीसाठी तुम्ही एवोकॅडो, ड्रायफ्रूट्स, पालेभाज्या आणि तीळ खावे. यामुळे तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :