Gondia Crime : गोंदियात विवाहित महिलेवर दबाव आणून लैंगिक अत्याचार, तीन आरोपींना बेड्या
Gondia Crime : विवाहित महिलेवर दबाव आणून दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे.
गोंदिया (Gondia) : विवाहित महिलेवर दबाव आणून दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात ही घटना घडली. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी दोन नराधमांवर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. तर तिसऱ्या आरोपीने शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
या घटनेतील 42 वर्षीय पीडित महिलेला तिच्या मुलाच्या उपचारांसाठी सप्टेंबर 2021 मध्ये गावातीलच आरोपींनी आर्थिक मदत केली होती. त्या मोबदल्यात दोन आरोपी तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करायचे. आरोपी देवेंद्र उर्फ बंडू मानकर (वय 50 वर्षे) आणि राजू ढिमरु मानकर (वय 48 वर्षे) अशी या दोन आरोपींची नावं आहेत. कधी शेतात तर कधी घरी तिला फोन करुन बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करायचे. तिने टाळण्याचे प्रयत्न केल्यास तिला फोनवर आरोपी धमकी द्यायचे. 9 ऑगस्ट 2023 रोजी तिला रात्री शेतातील उसाच्या वाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार नेहमी पाहणारा आरोपी अशोक भगळू मरठे (वय 50 वर्षे) यानेही तिला फोन करुन शरीरसुखाची मागणी केली.
तीन आरोपींना बेड्या
यानंतर पीडित महिलेने ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली. त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन तिघांवर रावणवाडी पोलिसांनी भारती दंड विधानच्या कलम 376 (ड), 376 (२), (एन), 354 (अ), 450, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चक्क वर्गातच गुरुजी दाखवायचे अश्लील चित्रफीत
गोंदियात काही महिन्यांपूर्वी एका शिक्षकाने विद्यार्थिनींना भर वर्गात अश्लील चित्रफित दाखवल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. शिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र, शिक्षकावरच अश्लील चित्रफित दाखवल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. संजय अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव होतं. गोंदिया तालुक्यातील एका जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या आरोपी शिक्षकाने पाचव्या वर्गातील समोरच्या टेबलवर बसणाऱ्या मुलींना अश्लील चित्रफित दाखविली. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना बॅडटच देखील केले. यासंदर्भात मुलींनी पालकांकडे तक्रार केली. मुलींनी सांगितलेल्या या प्रकाराने पालकांना धक्का बसला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली.
हेही वाचा
Gondia Crime : एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणाचा मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकू हल्ला