एक्स्प्लोर

Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडात नक्षल हल्ला; गडचिरोलीत हाय अलर्ट जारी

Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षली हल्ला झाल्यावर गडचिरोलीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 Maoist Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील (Dantewada Maoist attack) अरणपूर-पालनार मार्गावर नक्षल्यानी लावलेल्या IDE ब्लास्टमध्ये 11 जवान शहीद झाले. यामध्ये 10 DRG ( डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड) आणि एका चालकाचा समावेश आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्हा हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील (Maharashtra Gadchiroli) सीमावर्ती भागातील पोलीस मदत केंद्रांना पोलीस अधीक्षक यांनी अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

नक्षल टॅक्टिक कॉउंटर ऑफेन्सिव्ह पिरेस मध्ये G 60 जवानांच्या सर्च ऑपरेशन दरम्यान एसओपी नियमांचे उलंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या विशेष सूचना देण्यात आल्याचे नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले. विशेष करून छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागात सी 60 जवानांना सर्वात सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातही मागील काही वर्षात नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

अरणपूरमध्ये दुपारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले. तेथे एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान डीआरजीचे (जिल्हा राखीव जवान) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच जवान शोधासाठी निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. यामध्ये 10 जवान शहीद झाले. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनीही नक्षलवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी मोठ्या प्रमाणावर असल्याच्या माहितीवरून दंतेवाडा येथून डीआरजी जवानांना रवाना करण्यात आले. यानंतर सर्व जवान तेथून परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अरणपूर रस्त्यावरील पालनार येथे स्फोट घडवला. हे सैनिक खासगी वाहनाने निघाले होते. या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. तो या खाजगी वाहनाचा चालक होता. हल्ल्यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यात काही नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान घटनास्थळी दाखल झालेत. 

नक्षली घटनेत शहीद झालेले जवान आणि खासगी चालकांची नावे 

1. हेड कॉन्स्टेबल क्रमांक 74 जोगा सोधी

2. हेड कॉन्स्टेबल क्रमांक 965 मुन्ना राम कडती

3. हेड कॉन्स्टेबल क्रमांक 901 संतोष तमो

4. नवीन कॉन्स्टेबल क्रॅमॉक 542 डुलगो मांडवी

5. नवीन कॉन्स्टेबल क्यूमॉक 289 लखमू मरकम

6. निओ कॉन्स्टेबल कमॉक 580 जोगा कावासी

7. नवीन हवालदार क्रमांक 888 हरिराम मांडवी

8. गुप्त सैनिक राजू राम कर्तम

9. गुप्त सैनिक जयराम पोडियम

10. जगदीश कावासी, गुप्त सैनिक

11. धनीराम यादव (खाजगी चालक)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणारAnant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget