एक्स्प्लोर

10 लाखांचं बक्षीस असणाऱ्या दोन नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कामगिरी

Naxalite : गडचिरोली पोलिसांनी दहा लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन नक्षलवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Gadchiroli : गडचिरोली पोलिसांनी दहा लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन नक्षलवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. येथील उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोमके सावरगाव परिसरात सात ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवताना दोन संशयीत व्यक्ती आढळले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षलवादी असल्याचे समजले.  त्यानंत पोलिसांनी त्या दोघांमना ताब्यात घेवून पोमके सावरगाव येथे अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे आणि समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे यांचा समावेश आहे.

सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे हा ऑक्टोबर 2015 मध्ये टिपागड दलममध्ये भरती होवून, डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर माहे ऑगस्ट 2018 ते 2020 पर्यंत कंपनी दहामध्ये कार्यरत होता व सन 2020 ते आतापर्यंत पीपीसीएम म्हणून कंपनी दहामध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने नामे सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे याच्यावर आठ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. तसेच समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे हा जन मिलिशिया सदस्य असून, महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. सदर दोन्ही नक्षलवाद्यांचा खून, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्हयामध्ये सहभाग आहे. सदर अटक नक्षलवाद्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

दोन्ही नक्षलवाद्यांची चौकशी केली असता, त्यांना वरीष्ठ नक्षलवादी कॅडरकडून उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पुर्ववत करण्याकरीता पाठवल्याबाबतची माहीती दिली. परंतु या दोघांच्या अटकेमुळे त्यांच्या विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल अधिक सतर्क होवून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे ऑक्टोबर 2020 ते आतापर्यंत एकूण 16 नक्षलवाद्यांना (शासनाने जाहीर केलेले एकूण बक्षीस 66 लक्ष रूपये.), 19 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण (शासनाने जाहीर केलेले एकूण बक्षीस एक कोटी 24 लक्ष रूपये.), 55 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. (शासनाने जाहीर केलेले एकूण बक्षीस चार कोटी 10 लाख रुपये.) सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचं आवाहन केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Disha Patani : 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wariche Rang Shivlila Sobat : वारीतील वारकरी जेवण कसं बनवतात ?ABP Majha Headlines :  2:00PM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Diksha Bhumi | नागपूर दीक्षाभूमी पार्किंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूDive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Disha Patani : 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
Manoj Jarange : मध्यरात्री घराभोवती ड्रोनच्या घिरट्या, मराठा आंदोलक धास्तावले; मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
मध्यरात्री घराभोवती ड्रोनच्या घिरट्या, मराठा आंदोलक धास्तावले; मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमतातून जलजीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप 
कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमतातून जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच आरोप 
Embed widget