एक्स्प्लोर

ठाकरे सरकार करणार पाच दिवसांचा आठवडा? तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन दिवस कार्यालये बंद राहतील. त्यामुळे वीज-पाणी आणि इंधन तसेच अतिरिक्त काम यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते, असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत शासन स्तरावर फडणवीस सरकार सत्तेत होते तेव्हापासून हालचाली सुरु आहेत. सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा आणि निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्षे करण्यात यावं, अशी राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. पाच दिवसांचा आठवडा केल्याने दोन दिवस कार्यालये बंद राहतील. त्यामुळे वीज-पाणी आणि इंधन तसेच अतिरिक्त काम यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते, असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच पाच दिवसांचा आठवडा निवृत्तीचं वयही 60 केल्यामुळे खर्चात बचत होऊ शकते, असाही या संघटनांचा दावा आहे. मात्र निवृत्तीचं वय वाढवण्याबाबत सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची अनुकूलता नाही. पाच दिवसांचा आठवडा करण्याची त्यांची तयारी झाल्याची माहिती आहे. मंत्रालय आणि मुंबईतील संलग्न शासकीय कार्यालयांमध्ये जवळपास 1 लाख अधिकारी आणि शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था कमी आहे. त्यामुळे जवळपास 70 ते 80 टक्के कर्मचारी पनवेल, कर्जत, खोपोली, विरार येथून प्रवास करून येतात. पाच दिवसांचा आठवडा केल्याने कर्मचाऱ्यांना दोन दिवस विश्रांती मिळून ते ताज्या दमाने कामावर हजर राहतील, असं कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्याने विचार  फडणवीस सरकार असताना विधीमंडळात आज आमदार कपिल पाटील आणि अनंत गाडगीळ यांनी पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात लेखी प्रश्न विचारला होता. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना आणि शिक्षक भारती मागणीनुसार कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचं खरं आहे का? असा तो प्रश्न होता. यावर प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे अहवालानुसार सरकारचा निर्णय काय हा प्रश्नच उद्भवत नाही. असं फडणवीस यांनी सांगितलं होतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी जोर धरु लागली आहे. याच अनुषंघाने  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget