देशातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी उपराजधानीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ, चिमुकल्यांना आभासी घटनेची प्रत्येक्ष अनुभूती
First AI Anganwadi in Nagpur : देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूर जिल्यातील वडधामना येथे सुरु करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात आणखी 40 एआय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प
नागपूर जिल्हा परिषद ने पायलट प्रोजेक्ट म्हणून वडधमाना येथे AI तंत्रज्ञान आधारित पहिली अंगणवाडी सुरु केली आहे. मात्र पुढील टप्प्यात जिल्यातील 40 अंगणवाडी या AI तंत्रज्ञान आधिरीत असणार असल्याचे नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सांगितले. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेच्या विद्यर्थ्यांना पण AI आधारित शिक्षण देण्यावर असल्याचे विनायक महामुनी यांनी सांगितले.
ही भारतामधील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून, अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘मिशन बाल भरारी’ अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यात आणखी 40 एआय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटवून प्रत्येक मुलाचा उत्साह वाढावा, आनंद आणि कुतूहलाने त्याला शिकता यावे, हा या उपक्रमामागील भावनिक संकल्प आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील बालशिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.
भारताची पहिली एआय-सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकविण्यासाठी व्हिआर हेडसेट्स, एआय-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही सोय प्रीमियम खासगी बालवाड्यांमध्येही उपलब्ध नाही, असे वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























