एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची 'रिसोर्स बॅंक' होणार, उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. आता शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार केली जाणार आहे. याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे पाहणे गरजेचे आहे.
मुंबई : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्यामाध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारी तालुकास्तरावर अभियान घ्यावेत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विभागाला दिले आहेत. महिनाभरात ही बॅंक तयार करावी, अशा सूचनाही कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत. कृषीमंत्री भुसे यांनी नुकतेच पुणे येथे कृषी आयुक्तालयाच्या सर्व विभागांची बैठक घेतली. कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंचीही त्यांनी बैठक घेतली. त्यांनी मंत्रालयात सुमारे तीन तास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक, सहसंचालक, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. क्षेत्रीयस्तरावर प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या विविध अडचणींची माहिती कृषीमंत्र्यांनी करून घेतली.
अशाप्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच झाला. योजनांची अंमलबजावणी करतांना ज्या समस्या येतात त्यावर मार्ग काढला जातो मात्र त्यामुळे बऱ्याचदा यंत्रणेला रोषाला सामोरे जावे लागते, हे टाळण्यासाठी काय करू शकतो आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल, यावर देखील चर्चा झाली आहे. राज्यात अनेक शेतकरी परिस्थितीशी मुकाबला करत शेतीत आमुलाग्र बदल करणारे नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगाला यश देखील येत आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात अपेक्षित वाढ देखील होताना दिसतेय.
अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथा बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास त्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी फळ पिके, भाजीपाला यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी, अशी सूचना कृषीमंत्र्यांनी केली. या शेतकऱ्यांच्या बॅंकेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन तेही प्रात्यक्षिकांसह देण्याचा मानस असल्याचे भुसे यांनी सांगितले. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रयोगशील शेतकऱ्यांची यादी करून त्यांचा वापर प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement