(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : आरटीई प्रवेशाच्या तृतीय फेरीसाठी 28 जुनपर्यंत मुदतवाढ
आरटीई प्रवेशाच्या तृतीय फेरीसाठी 28जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना SMS पाठविण्यात आले आहे. पालकांनी निवडीबद्दल www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी.
नागपूर : चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेतर्गत तृतीय फेरीच्या प्रतिक्षा यादीतील पात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रीया 10 ते 21 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. शिक्षण संचालकांनी या प्रवेश प्रक्रियेसाइी 28 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निवड झाल्याबाबत पालकांचे मोबाईलवर SMS पाठविण्यात आले आहे. पालकांनी आपले पाल्याची निवड झाली अथवा नाही, याबाबत www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आरटीई पोर्टलला ॲप्लीकेशन व्हाईझ डिटेल ही सुविधा उपलब्ध आहे. पालकांनी या सुविधेचा वापर करावा. प्रवेश घेण्यासाठी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुका पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीप्ट घ्यावी. चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेंतर्गत तृतीय फेरीच्या प्रतिक्षा यादीतील प्रवेशपात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रीयेबाबत शाळा, पालक व सामाजिक संस्था यांनी दखल घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार यांनी केले आहे.
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन शिफारशी मागविल्या
नागपूर : केंद्र शासनाद्वारे 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनी सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी ऑनलाईन शिफारस पाठविण्याची प्रक्रिया सुर करण्यात आली असून 31 जुलैपर्यंत शिफारसी स्विकारण्याची अंतिम मुदत आहे. पुरस्कारासाठी सुयोग्य शिफारशी पाठविण्यात याव्यात, असे गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांनी कळविले आहे. त्यानुषंगाने www.awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जुलै 2022 पर्यंत नागरिकांनी ऑनलाईन शिफारशी पाठविण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या