Eknath Khadse : भाजप-शिंदे सरकारने श्रीराम नावाचा बाजार चालवलाय; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
मुक्ताईनगर, Jalgaon : राम मंदिराबाबत (Ram Mandir) राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिंदे सरकारने श्रीराम नावाचा बाजार चालवलाय.
मुक्ताईनगर, Jalgaon : राम मंदिराबाबत (Ram Mandir) राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिंदे सरकारने श्रीराम नावाचा बाजार चालवलाय. श्रीराम नावाचा निवडणुकीसाठी वापर केलाय जातोय, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले आहेत. ते मुक्ताईनगर (Muktainagar) येथील कुऱ्हा या गावात एका कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, भाजप-शिंदे सरकारने श्रीराम नावाचा बाजार चालावला आहे. निवडणुकीसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय. पुढील काळात लोकांशी या नेत्यांचे काही देणं घेणं नसेल. वाढती महागाई, कापूस भाव वाढ आणि बेरोजगारी अशा प्रश्नांची लोकांना जाणीव होऊ नये, यासाठी रामाचा मुद्दा पुढे केला जात आहे.
सरकार श्रीरामाच्या नावाचा आधार का घेत आहे? असा सवाला एकनाथ खडसे यांनी केलाय. श्रीराम हा तुमच्या एकट्याचा आहे का? श्रीरामावर तर मी बोलायला पाहिजे कारण मी एक कारसेवक होतो. मी गेलो होतो अयोध्याला कारसेवक असताना पंधरा पंधरा दिवस जेलमध्ये होतो. मात्र, आम्ही श्री रामाच्या नावाचा बाजार केला नाही. तुमच्यासारखे राजकारण केले नाही, असेही एकनाथ खडसे यांनी नमूद केले. विरोधकांनी कोणत्याच प्रश्नावर बोलू नये, यासाठी रामाच्या नावाचा आधार घेतला जात आहे. लोकांचे मन ओढवण्यासाठी यांनी नवीन सुरू केलं आहे, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला.
लोकसभा निवडणुक लढवण्यास एकनाथ खडसे इच्छुक
जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून एकनाथ खडसे इच्छुक आहेत. त्यामुळे रावेर मतदारसंघाची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी निश्चित असल्याचं म्हटलं जातंय. पण जळगाव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवार निश्चित नसल्याचं म्हटलं जातंय. यावर एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याकडे लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाचा एकही प्रभावी उमेदावर इच्छुक नाही. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार तयार नसल्याची कबुली देखील एकनाथ खडसे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यादृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दंड थोपटले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या