Nagpur : जिल्ह्यात दिवसभरात 72 पॉझिटिव्ह, एकूण 329 सक्रीय बाधित, तिघे रुग्णालयात
कोरोनाबाधितांचा आलेख पन्नासावर स्थिरावला असल्याची चिंताजनक स्थिती गेल्या 4 दिवसांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. बाधितांची संख्या कमी अधिक होत असून सलग चौथ्या दिवशी पन्नासावर बाधितांची नोंद झाली आहे.
नागपूरः शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत असून रविवारी शहरात 42 नवीन बाधितांची नोंद झाली तर ग्रामीणमध्ये 42 बाधित आणि जिल्ह्याबाहेरील दोघांचा यात समावेश आहे. दैनंदिन वाढती ही बाधित संख्या शहरवासियांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. यासह शहरातील सक्रीय बाधित संख्या 329वर पोहोचली आहे. यापैकी तिघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसी)मध्ये भरती केले आहे.
आज नागपूर शहरात 1534 चाचण्या करण्यात आल्या. आज शहरात 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज झालेल्या एकूण चाचण्यांपैकी 1459 जणांची रिपोर्ट निघेटिव्ह आली. शहरात सध्या 203 सक्रीय बाधित आहेत. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातही कोरोना वाढण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीणमध्ये आज 28 बाधित आढळून आले. आज ग्रामीणमध्ये 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा यात समावेश आहे. आज एकूण शहर, ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील एक रुग्णासहीत 40 कोरोनामुक्त झाले आहे.
सलग चौथ्या दिवशी पन्नासावर बाधित
कोरोनाबाधितांचा आलेख पन्नासावर स्थिरावला असल्याची चिंताजनक स्थिती गेल्या चार दिवसांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. बाधितांची संख्या कमी अधिक होत असून सलग चौथ्या दिवशी पन्नासावर बाधितांची नोंद झाली आहे.
मनपाकडून लसीकरणावर भर
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.