English Schools : शुल्क थकले तरी शिक्षण थांबवू नका; तक्रारी न थांबल्यास थेट कारवाई
शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे ऑनलाइन वर्ग बंद करणे, टीसी न देणे व शुल्क मागण्यासाठी त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. याची दखल घेण्यात आली.
नागपूरः कमकुवत आर्थिक स्थितीमध्ये अनेक पालक आपल्या मुलांच्या शाळेची फी वेळेत भरु शकत नाही. अशावेळी शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांवर फी भरण्यासाठी दाबव आणण्यात येतो. तरी शुल्क भरले नाही तर अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढण्याचे प्रकार कोरोनाकाळात घडले होते. तर आताही पालकांनी शुल्क भरले नाही तर त्यांना शाळेतून काढण्याच्या धमक्या शाळाप्रशासनाकडून देण्यात येतात. याच्या अनेक तक्रारी शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या असून तक्रारी न थांबल्यास थेट कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी स्वयंअर्थसाहाय्य अर्थात इंग्रजी शाळांना दिला आहे.
याविषयी तक्रारी आल्यास विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यान्वये कारवाईचा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडे शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे ऑनलाइन वर्ग बंद करणे, टीसी न देणे व शुल्क मागण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा प्रकारच्या तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास शिक्षण विभाग कमी पडत असल्याचाही आरोप होत होता. त्यानंतर वारंवार निर्देश देऊनही या शाळा शिक्षण विभागाचा आदेश मान्य करायला तयार नसल्याची बाब उघडकीस आली. यासंदर्भात इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापन प्रमुखांनी बैठक घेऊन त्यामध्ये कायद्याचा दाखला देत शासनाच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
सक्त कारवाईचे निर्देश
मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार मोफत व शिक्षणापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. त्यानंतरही तक्रारी न थांबल्यास थेट कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकारी कुंभार यांनी दिले. कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची सर्व शाळांनी खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur AAP : पंधरा वर्षापासून मनपामध्ये भाजपची सत्ता; राज्यात पाच वर्ष भाजपचे मुख्यमंत्री, तरीही एकही दर्जेदार सरकारी शाळा नाहीः आप आमदार
पुण्यात मुलींसाठी व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण शिबीर, गुणवंत खेळाडूंचा घेणार शोध
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI