Donald Trump: गुप्त कागदपत्रे लीक होण्याची भीती.. ट्रम्प सरकारचे मोठे पाऊल, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी होणार
Donald Trump: सरकारी गोपनीय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिग्राफ चाचणीची मदत घेतली जाईल, असा इशारा अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Donald Trump: अमेरिकेचे ट्रम्प सरकार सुरुवातीपासूनच हायपरॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांपासून ते अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुद्द्यांवर ट्रम्प प्रशासन अत्यंत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, गोपनीय फाइल्स लीक होण्यापासून वाचवण्यासाठी सरकार पॉलीग्राफ टेस्टचा (Polygraph Test) अवलंब करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी गोपनीय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिग्राफ चाचणीची मदत घेतली जाईल, असा इशारा अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना दिला आहे. अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने याबाबत कर्मचाऱ्यांना सावध केले असून, असे म्हटले आहे की, सरकारी गोपनीय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिग्राफ चाचणीची मदत घेईल.
या बाबत अधिक माहिती देताना गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत या चाचणीला सामोरे जावे लागेल. गृह मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव, ट्रिसिया मॅक्लॉफलिन यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की होमलँड सिक्युरिटी विभाग ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एजन्सी आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची पॉलीग्राफ चाचणी करू शकतो आणि करणार आहोत, असेही ते म्हणाले आहेत.
पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय?
पॉलीग्राफ चाचणी दरम्यान, प्रश्नांची उत्तरे देताना ती व्यक्ती खोटे बोलत आहे की खरे बोलत आहे हे पाहिले जातं. समजा एखादी व्यक्ति जेव्हा खोटं बोलते त्यावेळी त्याच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब बदलतो आणि घाम येतो. अनेक वेळा पॉलीग्राफ चाचणी करताना हात-पायांच्या हालचालींकडेही लक्ष दिले जाते. मात्र, पॉलीग्राफ मशिनवर चाचणी करताना चार गोष्टी साधारणपणे दिसतात. त्यात श्वासोच्छवासाचा वेग,(Breathing Rate). रक्तदाब.(Pulse Rate) ब्लड प्रेशर (Blood Pressure).किती घाम येतो ते (Perspiration)बघितले जातं.
पॉलीग्राफ चाचणी कशी कार्य करते?
पॉलीग्राफ चाचणी दरम्यान, मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छाती आणि बोटांना जोडलेले असतात. मग त्याआधी काही सामान्य प्रश्न विचारले जातात. यादरम्यान, मशीनच्या स्क्रीनवर व्यक्तीचे हृदय गती, रक्तदाब, नाडी इत्यादींचे निरीक्षण केले जाते. चाचणीपूर्वीही व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर त्याचे सामान्य हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडीचे प्रमाण इत्यादी नोंदवले जातात.परीक्षा सुरू झाली की प्रश्न विचारले जाऊ लागतात. मग उत्तर देणारी व्यक्ती खोटे बोलली तर त्या वेळी त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडीची गती वाढते किंवा कमी होते. कपाळावर किंवा तळहातावर घाम येणे सुरू होते. यावरून ती व्यक्ती खोटे बोलत असल्याचे दिसून येते.हे संकेत प्रत्येक प्रश्नाच्या वेळी नोंदवले जातात. जर एखादी व्यक्ती खरे बोलत असेल तर या सर्व शारीरिक हालचाली सामान्य राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या प्रश्नाचे खोटे उत्तर देते तेव्हा त्याच्या मेंदूतून P300 (P3) सिग्नल निघतो. अशा परिस्थितीत त्याच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो. हे सामान्य दरात मिसळले जातात. हे उत्तर खरे की खोटे हे लगेच कळते.
हे ही वाचा























