एक्स्प्लोर

नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर 10 मे पासून डिजीटल पेमेंट होणार बंद; सायबर पोलीस, बँकांच्या निर्णयाविरोधात पंपचालक आक्रमक 

Digital Payment Ban on Petrol Pump : नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर 10मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशन ने हा निर्णय घेतला आहे.

Nagpur Digital Payment Ban : नागपूर :  नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर 10मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट (Digital Payment) स्वीकारले जाणार नाही. विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशन ने हा निर्णय घेतला आहे. सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime) माध्यमातून मिळवलेला पैसा विविध खात्यातून फिरून अखेरीस पेट्रोल भरण्यासाठी वापरला गेल्याच्या काही घटना विदर्भात घडल्या. त्यानंतर पोलिसांच्या सायबर पथकाने आणि संबंधित बँकांनी पेट्रोल पंप मालकांचे बँक खाते गोठवले. त्यामुळे घडलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनेशी आमचा कुठलाही संबंध नसताना आणि ज्या ग्राहकाने आमच्याकडून पेट्रोल भरून डिजिटल पेमेंट केले आहे, त्याचाही त्या सायबर फसवणुकीशी कुठलाही संबंध नसताना, फक्त विविध बँक खात्यातून फिरत तो पैसा त्या ग्राहकाकडे आणि नंतर आमच्याकडे आला असल्याने आमचे खाते गोठवणे अन्यायकारक आहे, असा पेट्रोल डीलर्स असोसिएशनच म्हणणं आहे.

विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व पंपांवर डिजिटल पेमेंट घेण्यास बंद करू

सायबर पोलीस आणि बँकांच्या या अन्यायकारक कारवाईला विरोध म्हणूनच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास नकार दिले आहे. दरम्यान लवकर या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर येणाऱ्या काळात विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व पंपांवर डिजिटल पेमेंट घेण्यास बंद करू, असा इशाराही पेट्रोल डीलर्स असोसिएशन ने दिला आहे. सामान्य ग्राहकांनी मात्र डिजिटल पेमेंट सुरूच ठेवण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

सायबर पोलीस, बँकांच्या निर्णयाविरोधात पंपचालक आक्रमक 

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय. सद्यस्थितीत देशभरात डिझिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Vastu Tips : डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज...तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात 'हे' 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका
डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज...तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात 'हे' 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर
BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget