एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पर्दाफाश; आता काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, डोनाल्ड ट्रम्पकडे याचना 

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान सईद शेख (Rizwan Saeed Sheikh) यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, काश्मीरचा वाद हा भारत-पाकिस्तान संबंधांच्या मुळाशी आहे आणि तो सोडवणे हा तणाव कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. या दरम्यान, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हा "परमाणु फ्लैशप्वाइंट"  सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलंय.

भारत-पाकिस्तान युद्धामुळे 'अणुशस्त्र' पर्यायनिर्माण होऊ शकतो, हे शेख यांचे विधान राजकीय दबाव निर्माण करण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास भाग पाडण्यासाठी धोरणात्मक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की पाकिस्तानकडून अनेकदा जागतिक लक्ष वेधण्यासाठी अशी विधाने केली जातात, परंतु ही परिस्थिती संवेदनशील आहे आणि जर हे शब्द कूटनीतीचा भाग  असले तरी त्यांचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. असेही सांगितलं जातंय. 

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीचे आवाहन

रिझवान सईद शेख पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये तणाव निर्माण होतो तेव्हा जगाचे लक्ष त्याकडे जाते, परंतु काही काळ शांतता होताच जग त्याकडे डोळेझाक करते. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मात्र असे असले तरीही पाकिस्तानची ही एक जुनी रणनीती आहे. ज्यामध्ये पाकिस्तान भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि इतर देशांसमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतो.  

चौकशीपूर्वी आरोप करू नका - पाकिस्तान

या दहशतवादी हल्ल्याची मुळे पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा भारत सरकारकडून केला जात आहे. सुरुवातीच्या तपासात याचे पुरावेही सापडले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने भारताची भूमिका नाकारली आहे आणि म्हटले आहे की भारत कोणत्याही पुराव्याशिवाय खोटे आरोप करत आहे. भारताने म्हटले आहे की हा हल्ला सीमापार दहशतवादाचा एक भाग आहे जो दशकांपासून काश्मीरला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget