एक्स्प्लोर

Dhule News : धुळ्यात ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार! दोन वर्षात एकदाही मासिक सभा घेतली नाही, जिल्हाधिकाऱ्यांची अ‍ॅक्शन, महिला सरपंचाला दिला नारळ

Dhule News : धुळे तालुक्यातील धमाणे ग्रामपंचायतीत मिनाबाई विठ्ठल ठाकरे या दोन वर्षापूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.

धुळे : तालुक्यातील धमाणे ग्रामपंचायतच्या (Dhamane Gram Panchayat) सरपंच असलेल्या मिनाबाई विठ्ठल ठाकरे (Minabai Vitthal Thackeray) या दोन वर्षापूर्वी लोकनियुक्त सरपंच (Sarpanch) म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये मिनाबाई ठाकरे यांनी एकही मासिक सभा न घेतल्यामुळे गावकऱ्यांमधून रोष व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच असलेले रमेश मोहन बैसाणे यांनी धुळे (Dhule News) जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित धमाणे ग्रामपंचायतची पडताळणी करून मिनाबाई ठाकरे यांना अपात्र घोषित करावी, अशी मागणी केली होती. 

धुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घालून संबंधित ग्रामपंचायतीचे चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी दरम्यान मिनाबाई ठाकरे यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही मासिक सभा न झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर लोकनियुक्त असलेल्या सरपंच मिनाबाई ठाकरे यांना आज अखेर अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

धमाणे ग्रामपंचायतीत मनमानी कारभार

याबाबत माजी सरपंच रमेश बैसाने म्हणाले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे धमाणे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच पद अपात्र करण्याबाबत निवेदन दिले होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आम्ही हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडत होतो. धमाणे ग्रामपंचायतीत मनमानी कारभार सुरु होता. गोरगरिबांचे प्रश्न सुटत नव्हते. परंतु आज जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पद अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार, असे त्यांनी म्हटले आहे. 

जळगाव तालुक्यातील सरपंचही अपात्र  

दरम्यान, सरपंच निवड करीत असताना जात वैधता प्रमाणपत्र तपासणी केली नव्हती, या विषयी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी तक्रार जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे यांनी केली होती. यानुसार शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनावट आणल्याप्रकरणी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 30 डिसेंबरला अपात्र घोषित केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!

दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 PmABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सSandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Embed widget