धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उबाठा विरुद्ध समाजवादी पार्टीत मैत्रीपूर्ण लढत
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल गोटे आणि समाजवादी पक्षाकडून इर्शाद जहागीरदार हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
Dhule City vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमधील पक्ष एकाच मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत, त्या मतदारसंघात आता मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल गोटे आणि समाजवादी पक्षाकडून इर्शाद जहागीरदार हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
दरम्यान, धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अनिल गोटे आणि समाजवादी पक्षाकडून इर्शाद जहागीरदार हे मैदानात आहेत. या दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागेल असे सांगण्यात येत होते. मात्र, आता याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र देखील समाजवादी पक्षाने इर्शाद जहागीरदार यांना दिले आहे. दोघांपैकी कोणीही माघार घेतली नसल्यानं ही लढत मैत्रीपूर्ण होणार आहे.
इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच पेटल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. ही बंडखोरी महाविकास आघाडीसह महायुतीत देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळं नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला विधानसबा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे.
2019 च्या निवडणुकीत एमआयएमचा विजय
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अनिल गोटे यांना 2009 आणि 2014 या दोन विधानसभा निवडणुकीत शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती, मात्र 2019 च्या निवडणुकीत अनिल गोटे यांनी भाजपची साथ सोडत पुन्हा एकदा लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना 2019 च्या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला, तर अपक्ष उमेदवार असलेले राजवर्धन कदम मंडे यांना 43 हजार 372 मते मिळाली होती. 2019 साली राज्यात शिवसेना-भाजपची महायुती असल्याने धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला देण्यात आली होती, ही जागा भाजपला मिळावी असा आग्रह त्यावेळी करण्यात येत होता. मात्र, परंपरेनुसार ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले हिलाल माळी यांना महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली होती, या निकालात सर्वच राजकीय पक्षांना धूळ चारत एमआयएमचे फारुक शाह हे विजयी झाले होते.
महत्वाच्या बातम्या: