एक्स्प्लोर

Dhule City Vidhan Sabha Election Result 2024 : धुळे शहर मतदारसंघातील तिरंगी लढतीत भाजपची बाजी, अनुप अग्रवाल यांनी उधळला विजयाचा गुलाल

Dhule City Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना धूळ चारत एमआयएमचे फारुक शाह हे धुळे शहर मतदारसंघातून विजयी झाले होते.

Dhule City Vidhan Sabha Election Result 2024 : उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याकडे पाहिले जाते. तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात असताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या समस्या या कायम असल्याच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी बोलले जाते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात (Dhule City Assembly Constituency) यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. महाविकास आघाडीकडून (mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांना रिंगणात उतरवले. तर त्यांच्याविरोधात महायुतीतून (Mahayuti) भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांचे आव्हान होते. तसेच एमआयएमचे विद्यमान आमदार फारूक शाह (Faruk Shah) हे निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. मात्र भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा दणदणीत विजय झाला.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 2009 साली लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून अनिल गोटे हे 59 हजार 576 मतांनी विजयी झाले होते. तर 2014 साली अनिल गोटे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल 57 हजार 780 मते मिळवत विजय प्राप्त केला होता. तर 2019 च्या निवडणुकीत अनिल गोटे यांना तसेच सर्व हिंदू उमेदवारांना पराभवाची धूळ चाखत एमआयएमचे आमदार फारुक शहा हे 46 हजार 679 मते मिळवत विजयी झाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच मुस्लिम धर्मीय उमेदवार विजयी झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. 60 ते 70 टक्के हिंदू बहुल असलेला धुळे शहर विधानसभा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात गेल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील हिंदू उमेदवारांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. 2019 च्या निवडणुकीत धुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला होता 79 पैकी तब्बल 50 नगरसेवक हे भाजपचे विजयी झाल्यानंतर लोकसभेत देखील भाजपला घवघवीत यश मिळाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेले यश तसेच राज्यात आणि केंद्रात असलेली भाजपची सत्ता यामुळे शहराचा कायापालट होईल अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत होती. मात्र, शहरातील रस्ते पाणी आणि गटारी यासह मूलभूत सोयी सुविधांच्या समस्या आजही मोठ्या प्रमाणावर असल्याने या समस्यांचा निपटारा करण्याचे आव्हान विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारासमोर असणार आहे. 

2019 च्या निवडणुकीत एमआयएमचा विजय

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अनिल गोटे यांना 2009 आणि 2014 या दोन विधानसभा निवडणुकीत शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती, मात्र 2019 च्या निवडणुकीत अनिल गोटे यांनी भाजपची साथ सोडत पुन्हा एकदा लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना 2019 च्या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला, तर अपक्ष उमेदवार असलेले राजवर्धन कदम मंडे यांना 43 हजार 372 मते मिळाली होती. 2019 साली राज्यात शिवसेना-भाजपची महायुती असल्याने धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला देण्यात आली होती, ही जागा भाजपला मिळावी असा आग्रह त्यावेळी करण्यात येत होता. मात्र, परंपरेनुसार ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले हिलाल माळी यांना महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली होती, या निकालात सर्वच राजकीय पक्षांना धूळ चारत एमआयएमचे फारुक शाह हे विजयी झाले होते.

आणखी वाचा 

Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: यंदा पेणमध्ये कोण बाजी मारणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget