एक्स्प्लोर

Dhule जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसणारी पांझरा बारमाही योजना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने बारगळली

Dhule News : दुष्काळाच्या गर्तेत लोटलेला जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नसल्याचे दिसून येत आहे. धुळे जिल्ह्याची मुख्य नदी असलेली पांझरा नदी ही बारमाही करण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्न होणे गरजेचे आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि ही योजना कधी अस्तित्वात आली पुढे या योजनेचे काय झाले?

Dhule News : धुळे (Dhule) जिल्ह्याची मुख्य नदी म्हणून पांझरा नदीची (Panzara River) संपूर्ण राज्यात ओळख आहे. या जिल्ह्याचा 80 टक्के भूभाग हा पांझरा नदीच्या उपखोऱ्यामध्ये आहे. जिल्ह्यातील तीन तालुके नदीच्या पाणलोट क्षेत्रावर वसले असून ते पांझरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील 518 खेड्यांपैकी जवळपास 421 खेडी ही दरवर्षी दुष्काळग्रस्त असतात. मात्र जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ही ओळखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत. 2004-05 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय समविकास योजनेअंतर्गत पांझरा बारमाही योजना अस्तित्वात आणली. त्यासाठी जवळपास 856 कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. पांझरा नदी वाहती राहावी यासाठी ही योजना पाच टप्प्यांमध्ये अंमलात येणार होती. माथा ते पायथा या सिंचनाच्या तत्त्वानुसार ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नदीच्या उगमापासून मृदा संधारण जलसंधारण आणि वन संधारण या अंतर्गत सूक्ष्म जलसंधारण करुन ही योजना कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार नदीच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन बंधारे उभारण्यात येणार होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 856 कोटींपैकी 250 कोटी रुपये मंजूर आणि वितरित देखील झाले. मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी तो निधी अन्यत्र वळवला आणि ही योजना मात्र पूर्णतः बारगळली. लोकप्रतिनिधींच्या आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे धुळे जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ही योजना अद्यापही कार्यान्वित करण्याचा विचार पुढे आलेला नाही. 


Dhule जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ओळख पुसणारी पांझरा बारमाही योजना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने बारगळली

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरवर्षी पांझरा नदी काही प्रमाणात वाहते. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो. यामुळे काही महिने ही नदी वाहती असते. मात्र त्यानंतर नदीचे पाणी वाहून जाते. हे वाहून गेलेले पाणी तापी नदीला जाऊन मिळते. 136 किलोमीटरचा प्रवास करुन पांझरा नदी तापी नदीला जाऊन मिळते. साक्री तालुक्यातील शेंदवाडच्या डोंगरातून पांझरा नदीचा उगम होतो तर शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे पांझरा नदी तापी नदीला जाऊन मिळते. तापी नदीतून पांझरा नदी पात्रातील पाणी काही काळ अडवलं जातं. मात्र बॅरेजेस मधून शेतीला पाणी पुरवण्यासाठी राबवली जाणारी उपसा जलसिंचन योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. यामुळे काही कालावधीनंतर हे पाणी तापी नदीच्या पात्रात सोडले जाते. यानंतर हे पाणी वाहत जाऊन जिल्ह्यातील इतर नद्यांना मिळतं. तेथून पुढे तापी नदीतील पाणी गुजरातमधील उकाई धरणात जाऊन मिळते. यामुळे पांझरा नदीच्या पात्रावर वसलेली तीनही तालुके दरवर्षी दुष्काळग्रस्त राहतात. तापी नदीच्या 191 पैकी 181 टीएमसी पाणी उकाई धरणात जातं. यामुळे धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणी गुजरातला जात तिथे त्यांची समृद्धी होते. तर धुळे जिल्ह्याच्या वाटेला आलेला पाणी वापरलं जात नाही, अडवलं जात नाही. यासारखे धुळे जिल्ह्याचं कुठलंही दुर्दैव नाही.

धुळे जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ही ओळख पुसण्यासाठी राज्य सरकारसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पांझरा बारमाही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केल्यास जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ही ओळख पुसली जाईल आणि त्यातून जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Embed widget