एक्स्प्लोर

Dhule Khuni Ganpati : धुळ्याचा खुनी गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक, अनेक वर्षांची परंपरा; हे नाव कसं पडलं? 

Dhule Khuni Ganpati : धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो.

धुळे : आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa Morya) आगमन होत असून सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरामागे रंजक इतिहास आहे. धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीच्या नावामागे रंजक इतिहास असून हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून धुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. 

राज्यभरात गणेशाच्या (Ganesh Chaturthi) आगमनाने वातावरण चैतन्य पसरले असून आज सर्वत्र गणराय विराजमान होत आहेत. धुळे शहरातही सार्वजनिक मंडळाचे गणपती विराजमान होत असून यात धुळे शहरातील इंग्रज काळातील ऐतिहासिक व मानाचा मानला जाणारा खुनी गणपतीच्या (Dhule Khuni Ganesh) पालखीचे आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंगच्या गजरात आगमन झाले. खुनी गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून धुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे खुनी गणपतीच्या आगमन होत असताना गुलालाची उधळण करण्यात येत नाही. त्यानुसार आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंग वाजवत खुणी गणपती बाप्पाचे आगमन झाले. 

धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुनी गणपतीची स्थापना केली जाते. यासाठी शहरातील सर्वसमाज बांधव एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी एक महिना अगोदरपासूनच तयारी केली जाते. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासूनच खुनी गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु आहे. आज सकाळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणापासून टाळ मृदुगांच्या तालात खुनी गणपतीचे आगमन झाले. असं म्हणतात की, खुणी गणपतीची स्थापना 1865 साली झाल्याचे मानले जाते. त्यानंतर 1895 साली म्हणजेच इंग्रज राजवट लागू झाल्यानंतर येथील खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. तो सातत्याने आजपर्यंत सुरू आहे, त्याला विशेष आणि वेगळी परंपरा आहे. 

‘खुनी गणपती’ नाव कसे पडले.... 

खुनी गणपतीच्या नावामागे मोठा रंजक इतिहास सांगितला जातो, तो असा की, 1904 साली धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असतांना इंग्रजांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरु होते. त्यावेळी या गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला. काही वेळात या भांडणाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी उपस्थित ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला होता. ज्यामध्ये काही लोक मृत्यूमुखी पडले. यानंतर धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपती मिरवणुकीवेळी मशिदीच्या परिसरात खून होतात, अशी समजूत रुढ झाली. या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचे ‘खुनी गणपती’ हे नाव पडले. दरम्यान या घटनेनंतर यानंतर तत्कालिन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यावेळी निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला होता. तेव्हापासून या खूनी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक जामा मस्जिद समोरून जात असताना मशिदीमधील मौलाना स्वतः मशीदीच्या प्रवेशद्वारावर या खुनी गणपतीचे स्वागत करतात, यामुळेच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक मानला जातो. 

तृतीयपंथी बांधवांकडून गणेशाची वाजत गाजत मिरवणूक

सार्वजनिक गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून राज्यभरात मोठ्या उत्साहात विघ्नहर्ता गणेशाची स्थापना केली जात आहे. समाजातील विविध घटकांकडून गणरायाचे उत्साहात स्वागत केले जात असून धुळे शहरातील तृतीयपंथी बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना केली. विघ्नहर्ता गणरायाच्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून गणरायाचे वाजत गाजत सर्वत्र स्वागत केले जात आहे. धुळे शहरात तृतीयपंथी बांधवांनी गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत तृतीयपंथी बांधवांनी गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला. पावसाचा आगमन होऊन सर्वत्र भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी विघ्नहर्ता गणरायाकडे केली.

इतर महत्वाची बातमी : 

Godavari Express Ganesha : 'गोदावरीचा राजा'! मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या बाप्पाची स्वारी, तब्बल 27 वर्षांची परंपरा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget