Dhule Crime : धुळे जिल्ह्यात शंभरहून अधिक जणांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक
Dhule News : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांचा डोळा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसात सायबर गुन्हेगारांनी लाखो इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचे समोर आले आहे.
Instagram News : जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर सावधान ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून बिटकॉईन संदर्भात मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजवर क्लिक करताच संबंधित व्यक्तीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक (Instagram Account Hacked) होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. धुळे शहरासह (Dhule News) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शंभरहून अधिक जणांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांचा डोळा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसात सायबर गुन्हेगारांनी लाखो इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केल्याचे समोर आले आहे. त्याचा फटका इन्स्टाग्रामच्या युजर्सला बसला आहे. सायबर गुन्हेगार इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याअगोदर तुम्हाला एक मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये तुमचे अकाउंट हॅक करण्यात आलेले आहे. तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला तुमचा इन्स्टाग्राम अकाउंटला नवीन पासवर्ड बदलण्यासाठी विचारले जाते आणि नवीन पासवर्ड टाकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची संपूर्ण प्रोफाईल ही ताबडतोब सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते.
सायबर गुन्हेगार इन्स्टाग्राम युजरला एक बनावट लिंक पाठवतो व त्याला काही टास्क करण्याचे आदेश करतो. त्या आदेशाचे पालन करताच इन्स्टाग्राम युजरचे अकाउंट हॅक करण्यात येते. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केल्यानंतर सायबर गुन्हेगार आपण दिलेल ई-मेल आयडी व पासवर्ड बदलून टाकतो. आपल्या अकाऊंटद्वारे आपल्या परिचयातील लोकांना मेसेज पाठवतो आणि त्यांना देखील पासवर्ड बदलण्यास सांगतो. या पद्धतीने इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या घटना धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. शंभरहून अधिक जणांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. यात मुलींचा सर्वाधिक समावेश असून याप्रकरणी सायबर सेलेकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी इन्स्टाग्राम अकाउंट वापरताना आलेल्या कोणत्याही मेसेजवर क्लिक न करता त्याची शहानिशा करण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.
संबंधित बातम्या :